बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटतून मोठ्या काळानंतर रुपेरी पडद्यावर झळकला. ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून थंड प्रतिसाद मिळतो आहे. यावर आता मुख्य भूमिकेत असलेल्या करीना कपूरने भाष्य केले. (Kareena Kapoor joins hands in front of audience)
लाल सिंग चड्ढा हा चित्रपट प्रदर्शित होताच त्याबाबत नकारात्मक चर्चा सुरू झाल्या. ‘लाल सिंग चड्ढा बॉयकॉट’ सारखे हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड झाले. या सगळ्याचा परिणाम चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस गल्ल्यावर होताना दिसतोय.
करीना कपूर याबद्दल म्हणाली की, चित्रपटाला ट्रोल करणारे तेच १ टक्के लोक असतात. जे तुम्हाला सोशल मीडियावर ट्रोल करताना दिसतात. ट्रोल करणारे १ टक्के लोक असतात. मात्र सामान्य प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद यापेक्षा वेगळा असतो, असं ती म्हणाली.
पुढे करीना कपूर म्हणाली की, प्रेक्षकांनी हा चित्रपट जरूर सिनेमागृहात जाऊन पहावा. जर हा चित्रपट कोणी पाहिला नाही तर, एक चांगला चित्रपट पाहण्यावाचून मुकले, असे म्हणता येईल.
‘या चित्रपटासाठी तब्बल दोन वर्षे २५० लोकांनी भरपूर काम केले आहे. कृपया करून या चित्रपटावर बहिष्कार टाकू नका. हा चित्रपट प्रेक्षकांनी जरूर पहावा,’ अशी करीना कपूरची इच्छा आहे. चित्रपट पाहण्यासंदर्भात तिने प्रेक्षकांना आवाहनही केले.
प्रेक्षकांच्या थंड प्रतिसादावर याआधी आमिर खानने देखील भाष्य केले होते. आता करीना कपूरनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. मात्र ट्रोल करणाऱ्या लोकांकडे ती दुर्लक्ष करताना दिसते.
महत्वाच्या बातम्या-
‘आता फोन उचलल्यावर हॅलो ऐवजी वंदे मातरम बोलायचं’, सुधीर मुनगंटीवार यांचा मोठा निर्णय
खातेवाटपानंतर शिंदे गटातील ‘हे’ पाच मंत्री नाराज; एक मंत्री नॉट रिचेबल तर
विनायक मेटे यांच्या अपघाताबद्दल अजित पवारांची वेगळीच शंका; म्हणाले, रात्रभर चालकाने…