बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor) तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या कौटुंबिक जीवनासाठी जास्त चर्चेत असते. करीना नेहमीच तिच्या दोन मुलांचे तैमूर (Taimur) आणि जहांगीर अली खान (Jeh Ali khan) यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आता करीना म्हणते की, ती सैफ अली खानवर खूप इंप्रेस आहे कारण तो त्याच्या चार मुलांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत आहे.(Kareena Kapoor gives strict instructions to Saif Ali Khan)
तैमूर आणि जेह व्यतिरिक्त सैफला सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुले आहेत. करीना कपूर म्हणते की सैफ आपल्या चार मुलांना खूप वेळ देतो. करीना आणि सैफच्या धाकट्या मुलाचा जन्म गेल्या वर्षीच झाला होता. अशाप्रकारे सैफची मुलगी सारा आणि जेह यांच्यात 25 वर्षांचा फरक आहे. सैफ आणि करिनाचे 2012 मध्ये लग्न झाले आणि 2016 मध्ये त्यांचा मोठा मुलगा तैमूरचा जन्म झाला.
याबाबत वोग मॅगझिनशी बोलताना करीना म्हणाली, सैफला आयुष्याच्या प्रत्येक दशकात एक मूल आहे. त्यांना 20, 30, 40 आणि आता 50 मध्ये एक मूल आहे. मी त्याला सांगितले आहे की, आता तुझ्या आयुष्यात 60 च्या दशकात असे काहीही होणार नाही. मला वाटतं सैफसारखा खुल्या मनाचा माणूसच आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर चार मुलांचा बाप होऊ शकतो. त्यांनी प्रत्येक मुलाला वेळ दिला आहे.
करीना म्हणते, आता जेहसोबत आम्हीही समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही एक करार केला आहे की, जेव्हा तो शूटिंगला जातो तेव्हा मी घरी राहण्याचा प्रयत्न करते आणि सैफही तेच करतो. करिनाने सैफ आणि मोठा मुलगा तैमूर यांच्यातील बाँडिंगबद्दलही सांगितले.
करीना म्हणते की, टिमला (तैमूर) लोक आवडतात. जर घरी खूप लोक असतील तर त्याला त्यांच्यामध्ये राहायचे असते. तो अगदी लहान सैफसारखा आहे ज्याला रॉकस्टार व्हायचे आहे आणि त्याच्या वडिलांसोबत AC/DC आणि Steely Dan असते. त्यांच्यात एक विलक्षण बॉन्डिंग आहे. टिम म्हणतो, अब्बा माझे चांगले मित्र आहेत.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर करीना कपूर आता आमिर खानसोबत ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय करीना दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या एका चित्रपटात आणि सुजॉय घोषच्या सिरीजमध्ये दिसणार आहे. सैफ अली खानबद्दल बोलायचे तर तो लवकरच प्रभास आणि क्रिती सेननसोबत ‘आदिपुरुष’मध्ये दिसणार आहे. याशिवाय तो हृतिक रोशनसोबत ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्येही दिसणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
सावळे लोक अभिनय करू शकत नाही का? बॉलिवूडमधील वर्णभेदावर नवाजुद्दीनने साधला निशाणा
नशीबाचा खेळ! मुलीने सरकारी नोकरीसाठी केली ६.७० लाखांची पुजा, पण मिळालीच नाही नोकरी
मिलिंद गवळी यांना अभिनयात यश मिळावं, यासाठी त्यांच्या सासूबाई करायच्या हे काम; अभिनेत्याने सांगितला किस्सा
काय सांगता! या पेनी स्टॉकमुळे ८ लाखांचे झाले ३ कोटी; ३ वर्षात दिला तब्बल ३५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा