VIDEO: स्वत:ला झिरो फिगर म्हणवून घेणारी करीना बिर्याणी बघताच विसरली डाएट, एकटीनेच मारला ताव

बॉलीवूड अभिनेत्री या आपल्या शरीराकडे खूप लक्ष देतात. नेहमी आपले पथ्य पाळत असतात. मात्र कधीकधी या अभिनेत्रींचा आपल्या मनावरील ताबा हा सुटतो. असेच काहीसे एक अभिनेत्री सोबत घडले आहे. ती अभिनेत्री म्हणजे बॉलीवूडची बेबो म्हणजे करीना कपूर होय. करीना आपल्या शरीराची खूप काळजी घेते. नेहमीच पथ्य पाळते. व्यायाम करत राहते.

तसेच करीना ही तिच्या झिरो फिगरसाठी देखील प्रसिद्ध झाली आहे. मात्र तिला एक पदार्थ प्रचंड आवडतो. तो पदार्थ जर करीनाच्या समोर आला तर ती स्वतःला रोखू शकत नाही. असेच काहीसे करीना सोबत घडले आहे. ज्याचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये करीना आपलं आवडता पदार्थ मनसोक्त खात आनंद घेत आहे.

करीना नुकतीच मालदीवमधून सुट्टी एन्जॉय करून आली आहे. या सुट्टीमध्ये तैमूर, जेह, करिश्मा कपूर, करिश्माची दोन्ही मुलं कियान आणि समायराही तिच्यासोबत होते. त्याचबरोबर मुंबईत परत येताच तिने कामाला सुरुवात केली आहे. करीना नेहमीच स्वतःला फूडी म्हणवते. मात्र, तिला बिर्याणी खूप आवडते. सध्या तिचा बिर्याणी खात असतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ करिनाने इंस्टाग्रामवर तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. ज्यामध्ये ती बिर्याणी खाताना दिसत आहे. करीना तिच्या संपूर्ण टीमसोबत आहे. ती तिच्या ताटात बिर्याणी काढते. तिच्या टीमचे सदस्यही एक-एक करून बिर्याणी खातात आणि जेवणाची स्तुती करतात.

या व्हिडिओमध्ये करीना म्हणते की, “हा डब्बा रिकामा होईल.” यासोबतच ती उद्या मूग डाळ खीर आणणार असल्याचे सांगत आहे. व्हिडिओसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘मंडे ब्लूज बिर्याणी… उद्याच्या गोडाचे प्लॅनिंग आधीच केले आहे.’ तसेच या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. यामध्ये तिची नणंद सबा पटौदीने हार्टचा इमोटिकॉन बनवला आहे. तसेच बहिण करिश्मा कपूरने लिहिले की, ‘मी बिर्याणी मिस करत आहे.’ तर करिनाची मैत्रिण पूनम दमानिया लिहिते की, ‘उफ माय फेव्हरेट.’ राखी सावंत म्हणाली की, ‘मला पण पाठवा.’

करीनाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, नुकतीच तिच्या पुढील प्रोजेक्टची घोषणा करण्यात आली. ती नेटफ्लिक्स चित्रपट करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजॉय घोष करणार आहेत. तसेच या चित्रपटात जयदीप अहलावत आणि विजय वर्मा मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय करिनाचा ‘लाल सिंह चड्ढा’’ हा चित्रपट देखील लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात आमिर खान देखील मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट १४ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.