बॉलीवूड कलाकारांनी नुकताच होळीचा सण जोरदार पद्धतीने साजरा केला. अनेकांनी पार्टीचे आयोजन करून होळी साजरी केली. तर अनेकांनी साध्या पद्धतीने साजरी केली. याच दरम्यान काही फोटो आणि व्हिडिओ अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. सध्या हे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
मात्र बॉलिवूडची एक अशी अभिनेत्री होती जिने वेगळ्याच पद्धतीने होळीचा आनंद घेतला आहे. ती अभिनेत्री म्हणजे बॉलिवूडची बेबो उर्फ करीना कपूर खान. करीना प्रत्येक सण उत्साहाने साजरा करते. तिनेही होळीच्या दिवशी असेच काहीसे केले आहे.ज्याचे काही फोटो तिने इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
करीना कपूरच्या या अनोख्या होळी सेलिब्रेशनला नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे. करीनाचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सध्या करीना बहीण करिश्मा कपूरसोबत मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. तसेच करीना तिची दोन मुले तैमूर आणि जहांगीरसोबत या सुट्टीचा आनंद घेत आहे.
मालदीवमध्येच करीनाने होळीचा आनंद घेतला. तसेच तिने फोटो शेअर करत सर्वांना होळीच्या शुभेच्छा देखील दिल्या. या फोटोमध्ये करीना लहान मुलगा जहांगीर अली खानसोबत समुद्रकिनाऱ्यावर वाळूत मजा करताना दिसत आहे. तसेच तिने मोनोकिनी परिधान केली आहे. त्याचबरोबर करीना जेहसोबत वाळूचा ढिगारा बनवताना दिसत आहे.
यामध्ये दोघेही खूप आनंदी आणि उत्साहित दिसत आहेत. हा फोटो पोस्ट करत करिनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘या होळीमध्ये आम्ही वाळूचा ढिगारा केला. होळीच्या शुभेच्छा.’ त्याचबरोबर एक दिवस अगोदर करिनाने तिच्या सुट्टीचे काही फोटो शेअर केले होते. जे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ही काही फोटो शेअर केले होते. यामध्ये करीना काळ्या मोनोकिनी घातली होती आणि तिचा धाकटा मुलगा जेहसोबत ब्लूजचा आनंद लुटताना दिसला. हा फोटो पोस्ट करत तिने लिहिले की, ‘मी कुठे आहे?’ तसेच या फोटोला चाहते लाइक्स आणि कमेंट्स करत आहेत.
करीनाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये तिच्यासोबत आमिर खान देखील असणार आहे. याच्या व्यतिरिक्त करिनाने तिच्या ओटीटी पदार्पणाचीही घोषणा केली आहे. बुधवारी १६ मार्च रोजी सकाळी चाहत्यांना एका चित्रपटाची घोषणा करून सुखद धक्का दिला. हा एक थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात जयदीप अहलावत आणि विजय वर्मा यांच्यासोबत करीना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘कहानी’ फेम सुजॉय घोष करणार आहे.