Share

करण-तेजस्वीने उघडले बेडरूमचे सिक्रेट, सांगितले कोण चांगल्या पद्धतीने करते ‘हे’ काम

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश(Tejaswi Prakash) आणि करण कुंद्रा ही जोडी सर्वात लोकप्रिय स्टार कपल बनली आहे. येत्या काही दिवसांपासून या कपलचे सर्व पीडीए, उत्कृष्ट फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर येत आहेत, जे काही मिनिटांत व्हायरल होतात.(karan-tejaswi-reveals-the-secret-of-the-bedroom-saying-who-does-this)

करण(Karan Kundra) आणि तेजस्वी पब्लिक प्लेसवरही रोमान्स करण्यास मागेपुढे पाहत नाहीत, परंतु या कपलने त्यांच्या बेडरूमचे रहस्य देखील उघड केले होते. वास्तविक, रिअॅलिटी शोमध्ये कंगना रनौतने करण आणि तेजस्वीला विचारले होते की, त्यांच्यापैकी कोण. चांगला किसर आहे? त्यावर या कपलने अगदी प्रांजळपणे उत्तर दिले होते.

कंगनाच्या(Kangana) या प्रश्नाला उत्तर देताना करण कुंद्राने तेजस्वीचे नाव घेतले आणि तिला गुड किसर म्हटले. यानंतर तेजस्वी खूपच लाजताना दिसली. ही घटना कंगना राणौतने होस्ट केलेल्या OTT रिअॅलिटी शो ‘लॉक अप’मधली आहे. जेव्हा करण आणि तेजस्वी शोमध्ये एकत्र दिसले होते.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, आजकाल तेजस्वी ‘नागिन 6′(Nagin 6) शोमध्ये दिसत आहे. त्याचबरोबर ती अभिनेता आयुष्मान खुरानासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘ड्रीम गर्ल 2’ या चित्रपटात तेजस्वी आयुष्मानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राची प्रेमकहाणी बिग बॉसच्या(Big Boss) घरापासून सुरू झाली. या सीझनमध्ये दोघेही दिसले होते. घरात त्यांच्या जवळीकतेची बरीच चर्चा होती आणि जेव्हा हा सीझन संपला तेव्हा दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते.

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now