Share

तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राच्या नात्यावर कुटुंबीयांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, लवकरच..

Karan Kundra And Tejasswi Prakash

हिंदीतील प्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉसचा १५ वा सीझन नुकताच संपन्न झाला. या सीझनमध्ये तेजस्वी प्रकाशने विजेतेपद फटकावले आहे. ‘बिग बॉस’ शो जिंकल्यानंतर तेजस्वी प्रकाश प्रसिद्धीझोतात आली असून सर्वत्र तिची चर्चा सुरु आहे. यामध्ये आता तेजस्वीच्या करण कुंद्रासोबतच्या लग्नाच्या चर्चांनीही जोर धरला (Karan Kundra And Tejasswi Prakash) आहे. यादरम्यान आता यावर करण कुंद्राच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

‘बिग बॉस १५’ च्या ग्रँड फिनालेवेळी तेजस्वी आणि करणच्या कुटुंबीयांनी सोहळ्यात उपस्थिती दर्शविली होती. यावेळी तेथे उपस्थित माध्यम कर्मीयांनी दोघांच्या लग्नाबाबत त्यांच्या कुटुबीयांकडे विचारणा केली होती. त्यावेळी दोघांच्याही कुटुंबीयांनी तेजस्वी-करणच्या लग्नाला मंजूरी दिली होती. त्यानंतर करण कुंद्राचे वडिल एसपी कुंद्रा यांनी करण-तेजस्वीच्या लग्नावर आपली प्रतिक्रिया दिली.

‘बिग बॉस १५’ शोचा महाअंतिम सोहळा पार पडल्यानंतर करण कुंद्राचे वडिल एसपी कुंद्रा माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी करणसंदर्भात अनेक गोष्टी सांगितल्या. तसेच यावेळी त्यांना तेजस्वी आणि करणच्या लग्नाबाबत विचारण्यात आले असता लवकरच त्या दोघांचा लग्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले.

एसपी कुंद्रा यांचा हा व्हिडिओ Instant Bollywood नावाच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आला आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. करण आणि तेजस्वीचे चाहते या व्हिडिओला खूप पसंती देत आहेत. सोबतच यावर अनेक कमेंट करत आपली प्रतिक्रिया देत आहेत.

दरम्यान, तेजस्वी प्रकाश ‘बिग बॉस १५’ शोची विजेती बनली तर करण कुंद्रा दुसरा उपविजेता ठरला. तर प्रतीक सहजपाल या सीझनमध्ये पहिला विजेता ठरला. प्रतीक आणि तेजस्वी टॉप २ मध्ये पोहोचल्यानंतर सर्वांनाच वाटले होते की, प्रतीक शोचा विजेता बनणार. तसेच सोशल मीडियावरही त्याला अनेक लोक सपोर्ट करताना दिसले. मात्र, सलमान खानने तेजस्वीच्या नावाची विजेता म्हणून घोषणा करताच काही क्षणांसाठी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

‘बिग बॉस १५’ च्या घरात करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाशची लव्हस्टोरी सुरु झाली होती. सुरुवातीस त्या दोघांची चांगली मैत्री झाली त्यानंतर दोघांचे एकमेकांवर प्रेम सुरु झाले. मात्र, अनेकवेळा त्यांच्यात तक्रारी होतानाही दिसून आले. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या नात्याबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र, त्यानंतर ते शेवटपर्यंत एकमेकांसोबत राहिले. सोशल मीडियावर तर आता या जोडीला ‘तेजरन’ नावाने ओळखले जाते. या नावाचा हॅशटॅगही सध्या ट्रेंड होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
असे चित्रपट कधीच करणार नाही जे माझी मुलगी आणि पत्नी…, अल्लू अर्जुनच्या या वक्तव्याचं होतंय कौतुक
नागिन 6: तेजस्वी प्रकाशच्या नागिन लूकने केला कहर; किलर परफॉर्मन्स पाहून चाहते झाले घायाळ
आर्ची अन् परशा सैराट! स्वत: रिंकूनेच ‘ते’ खाजगी फोटो पोस्ट करत चाहत्यांना दिला आश्चर्याचा धक्का

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now