मागील काही दिवसांपूर्वीच कलर्स वाहिनीवरील ‘बिग बॉस’ या शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. आता या शोनंतर ‘हूनरबाज’ हा शो सुरू झाला आहे. या शोमध्ये अनेक स्पर्धक आपल्यातील कलागुण सादर करतात. त्याचबरोबर या शोचे परीक्षक दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती, अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि दिग्दर्शक करण जोहर हे आहे.
या शोव्दारे अनेक लोकांमधील कलागुण प्रेक्षकांसमोर आले आहेत. त्याचबरोबर सध्या या शोचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. यामध्ये परीक्षक करण जोहरने एका गोष्टीचा खुलासा केला आहे. जे ऐकून उपस्थित असेलल्या सर्वांचं हसू आवरले नाही.
हा किस्सा ‘कभी खुशी कभी गम’ च्या शूटिंग दरम्यानचा आहे. करणने सांगितले की, ‘सूरज हुआ मधम’ गाण्याच्या शूटिंगदरम्यान इजिप्तमध्ये अचानक त्याचे पोट बिघडले. त्यानंतर असे काही घडले, ज्यातून तो आजपर्यंत सावरला नाही. हुनरबाजच्या सेटवर जेव्हा करण जोहरने या घटनेचा खुलासा केला तेव्हा उपस्थित सर्वजण हसू लागले.
दिग्दर्शक करण जोहरचा ‘कभी खुशी कभी गम’ हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्याचबरोबर यातील गाणे देखील चाहत्यांना खूप आवडले होते. आजही चाहते या गाण्यांचे वेडे आहेत. या दरम्यानचा करणने एक मजेदार किस्सा सांगितला आहे.
करणने सांगितले की, “ही इजिप्तची घटना आहे. तिथे आम्ही शाहरुख खान आणि काजोलसोबत ‘सूरज हुआ मधम’ या गाण्याची शूटिंग करत होता. ही अशी जागा होती जिथे शेकडो किलोमीटरपर्यंत फक्त चुनखडी होती. तिथे फक्त आम्हीच होतो बाकी कोणीही नव्हते. मला वाटले की जर स्वर्ग कुठे असेल, तर तो इथे आहे. तो अतिशय सुंदर पांढरी वाळू आणि फक्त चुनखडी असलेला भाग होता.”
त्याचबरोबर करण पुढे म्हणाला की, “ आम्ही तिथे पोहचलो. त्यानंतर सकाळी अचानक माझे पोट बिघडले आणि मला जुलाब लागली. आजूबाजूला एकही तंबू किंवा स्नानगृह नव्हते. म्हणून मी मोठ्या चुनखडीच्या डोंगराच्या मागे जावं असे ठरवले. तिथे मला जे काही करायचे आहे ते मी करणार होती. कारण मला हे थांबवता येत नव्हते. म्हणून मी गेलो आणि सुरुवात केली. मला अचानक आवाज ऐकू आला. मग मी वळून पाहिले.”
त्याचबरोबर करण पुढे म्हणाला की, “तेव्हा हॉलीवूडचा एक क्रू लोकेशन शोधण्यासाठी त्याच ठिकाणी येत होता. ते दुसर्या देशातील सुमारे २० लोक होते. त्यांनी माझ्याकडे पाहिले. जेव्हा त्याचा कॅमेरा निघणार होता, तेव्हा मी वळलो आणि म्हणालो की, कृपया, मी या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे, थोडा आदर करा.”
तसेच करण पुढे म्हणाला की, “मग ते म्हणाले ठीक आहे, तुमचे काम करा. मग ते नम्रपणे वळून निघून गेले. त्यांनी ना शाहरुख पाहिल ना काजोल पाहिल. त्यांनी फक्त माझा पिछवाडा पाहिला. मी अजूनही या घटनेतून सावरलो नाही.” त्याचा किस्सा ऐकून परिणिती चोप्रा आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यासह सर्वजण हसू लागले.