बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) हिने आपल्या स्टाईलने बॉलिवूडमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘बरसात’ चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या ट्विंकल खन्नाचा शेवटचा चित्रपट ‘लव के लिए कुछ भी करेगा’ हा होता. अक्षय कुमारसोबत लग्न केल्यानंतर ट्विंकल खन्नाने बॉलिवूडला अलविदा केले.(Karan Johar was in love with Twinkle Khanna)
ट्विंकल खन्नाच्या आयुष्यात असे काही लोक आहेत जे तिच्यावर एकतर्फी प्रेम करायचे. बॉलिवूडचा लोकप्रिय निर्माता करण जोहर देखील या यादीत आहे. जो आपले हृदय अभिनेत्री ट्विंकल खन्नाला देऊन बसला होता. करण जोहरशी संबंधित या गोष्टीचा खुलासा स्वत: ट्विंकल खन्नाने तिच्या पुस्तकाच्या लाँचच्या वेळी केला होता.
‘मिसेस फनीबोन्स’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात हा खुलासा झाला. ट्विंकलने सांगितले की, करण जोहर माझ्या मिशांवर फिदा झाला होता. याबाबत ट्विंकल खन्ना म्हणाली की, करणने माझ्यासमोर त्याचे मन मोकळे करत मनातली गोष्ट सांगून टाकली होती. त्यावेळी मला हलक्या हलक्या मिशा आल्या होत्या. करण जोहरबद्दल बोलताना ट्विंकल खन्ना पुढे म्हणाली की, करण जोहर नेहमी माझ्या मिशांची प्रशंसा करायचा.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की फक्त ट्विंकल खन्नाच नाही तर करण जोहरने देखील याबद्दल खुलासा केला आणि सांगितले की ट्विंकल खन्ना ही एकमेव महिला होती जिच्या तो प्रेमात पडला होता. आम्ही तुम्हाला सांगतो की करण जोहर ट्विंकल खन्नाला भेटण्यासाठी त्याच्या बोर्डिंग स्कूलमधून पळून गेला होता. बोर्डिंग स्कूलमधून पळून जाण्याची कल्पना त्याला ट्विंकल खन्नानेच दिली होती.
ट्विंकल खन्नामुळे एकदा करण जोहरचेही हृदय तुटले होते. करण जोहरने ट्विंकल खन्नाला ‘कुछ कुछ होता है’मध्ये ‘टीना’च्या भूमिकेची ऑफर दिली होती. परंतु अभिनेत्रीने ही भूमिका करण्यास स्पष्टपणे नकार दिला. यावर करण जोहर म्हणाला होता की, ट्विंकल खन्नाने माझा डेब्यू चित्रपट करण्यास नकार दिला होता, त्यानंतर माझे मन दुखले होते.
महत्वाच्या बातम्या-
करीना कपूरने ट्विंकल खन्नासमोर केला मोठा खुलासा, म्हणाली, अक्षय कुमारने सैफ अली खानला माझ्यासोबत..
अक्षयकडे माझ्यापेक्षा जास्त.., ट्विंकल खन्नाने उघड केले गुपित, ऐकून अक्षयही झाला हैराण
तुझ्या मुर्ख बायकोला समजाव नाहीतर.., ट्विंकलच्या ‘या’ कृतीमुळे अक्षयकुमारवर भडकले लोकं
अर्जुन कपूरने मलायका अरोरालाच केले ट्रोल, त्यानंतर मलायकानेही दिले मजेशीर उत्तर, म्हणाली..