भारती सिंहसाठी (Bharti Singh) 3 एप्रिलचा दिवस नवा आनंद घेऊन आला. या दिवशी देशातील सर्वात मोठी कॉमेडियन आई बनली आणि एका नव्या प्रवासाला सुरुवात झाली. मूल झाल्याची आनंदाची बातमी भारतीचे पती हर्ष लिंबाचिया (Haarsh Limbachiyaa) यांनी त्यांच्या इन्स्टा अकाउंटवर एका पोस्टद्वारे दिली होती. या बातमीने भारतीचे चाहते प्रचंड खुश झाले आहेत. दरम्यान, सलमान खानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो भारती आणि हर्षच्या मुलाला लॉन्च करण्याबद्दल बोलत होता.(Karan Johar refuses to launch Bharti-Harsh’s son)
भारती बिग बॉसच्या सेटवर पोहोचली होती त्यावेळी ती गरोदर होती. भारती आणि हर्ष ‘हुनरबाज’ शोच्या प्रमोशनसाठी आले होते. यादरम्यान सलमान खानने हर्ष आणि भारतीला सांगितले की, तो त्यांच्या मुलाला लॉन्च करणार आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, हा व्हिडिओ 3 महिन्यांपूर्वीचा आहे.
हा व्हिडिओ ‘बिग बॉस 15’ मधील आहे, जेव्हा भारती आणि हर्ष दोघेही त्या शोमध्ये पोहोचले होते, जिथे दोघांनी मिळून सलमान खानला खूप हसवले होते. या शोचा एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये हर्ष सलमानला सांगतो, ‘भारती प्रेग्नंट आहे आणि लवकरच शोच्या फिनालेपूर्वी आमचाही फिनाले होणार आहे.’
व्हिडिओमध्ये पुढे भारती सलमानला म्हणते, ‘तुमचे खूप आशीर्वाद हवे आहेत आणि तुमचे फार्म हाऊस हवे होते, बेबी शॉवरसाठी, भेटेल का सर.’ तेव्हा सलमान खान म्हणतो, ‘नक्की’. त्यानंतर हर्ष आणि भारती म्हणतात, ‘सलमान सर, आम्हाला आमच्या मुलाला लॉन्च करायचे होते, पण करण जोहरने तोंडावर नकार दिला.
भारती म्हणते की, ‘करण जोहरच्या नकारानंतर आम्ही तुमच्याकडे आलो आहोत. सलमान सर, तुम्ही आमच्या मुलाला लाँच कराल?.’ तेव्हा सलमान म्हणतो, ‘नक्की, मी तुमच्या मुलाला लॉन्च करेन.’ त्यानंतर भारती म्हणते, आरे व्वा, सलमान खान भारती आणि हर्षच्या मुलाला लॉन्च करणार. धन्यवाद सर!
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, भारतीने 2017 मध्ये लेखक हर्ष लिंबाचियासोबत लग्न केले होते. ती हर्षपेक्षा 7 वर्षांनी मोठी आहे. जवळपास 7 वर्षे डेट केल्यानंतर दोघांनी एकमेकांना सोबती म्हणून निवडले. हर्षने ‘पीएम नरेंद्र मोदी बायोपिक’चे संवाद लिहिले आहेत. याशिवाय ‘मलंग’ चित्रपटाचा टायटल ट्रॅकही त्याने लिहिला होता.
महत्वाच्या बातम्या-
मी तुमच्या बायकोवर बोलत नाही, तुम्ही माझ्या नवऱ्याला मध्ये का आणता? चित्रा वाघ कडाडल्या
श्रीलंकेच्या पंतप्रधानांच्या सुनेनं कुटुंबियांसोबत सोडला देश, श्रीलंका आता वाऱ्यावर, लोकं संतापले
औरंगाबादेत इंजिनियर तरुणाने केला भयावह शेवट, सुसाईड नोटमधून धक्कादायक खुलासा
वक्फ बोर्डाच्या जमिनींवर चालवणार बुलडोझर, मदरशांबाबतही केले मोठे वक्तव्य, योगींच्या मंत्र्याची मोठी घोषणा