करण जोहरने ऑन कॅमेरा बड्या अभिनेत्रीचं घेतलं चुंबन; किसिंग व्हिडिओ झाला व्हायरल

मुंबई। बॉलिवूडमधील कलाकार हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. त्यांच्या चाहत्यांचे त्यांच्यावर बारीक लक्ष असते. कोणती अभिनेत्री कुठे जाते? कुणाला भेटते अगदी रोजच्या जेवणात काय काय खाते याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष असते. तसेच अभिनेता अभिनेत्री यांच्या पोस्टवर किंवा व्हायरल व्हिडीओवर चाहत्यांचा भरघोस प्रतिसाद देखील मिळतो.

बॉलिवूडमधील अनेक कलाकार हे त्यांच्या लुकमुळे, फिल्ममुळे किंवा त्यांच्या मैत्रीमुळे नेहमीच चर्चेत असतात. बॉलिवूडमधील अशीच एक जोडी म्हणजे काजोल आणि निर्माता, दिग्दर्शक करण जोहर. या दोघांमध्ये अगदी तारुण्यावस्थेपासून घट्ट मैत्री आहे. हे दोघे एकमेकांचे चांगले जिवलग मित्र असून ते नेहमीच चर्चेत असतात.

सध्या करण आणि काजोलच्या त्या व्हायरल व्हिडीओमुळे ते दोघेही सोशल मीडियावर चर्चेचा चांगलाच विषय बनले आहेत. धर्मा प्रॉडक्शन्सच्या सीईओ अपूर्व मेहता यांचा नुकताच वाढदिवस झाला. त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत करण जोहर आणि काजोलने देखील हजेरी लावली होती.

या बर्थडे पार्टीत काजोलने काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. त्या ड्रेसमध्ये ती नेहमीप्रमाणेच खुप सुंदर दिसत होती. कोजोलने या पार्टीत एंट्री केल्यानंतर करण देखील तिथे आला आणि त्यावेळी एक किस्सा घडला. त्या घडलेल्या किस्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला की नेटकऱ्यांनी लगेच आपल्या प्रतिक्रिया दिल्या.

नेमकं काय घडलं तिथे? तर काजोल पार्टीसाठी आल्यानंतर फोटोसाठी पोझ द्यायची म्हणून तिने तिच्या हातातील फोन करणला दिला. करणने मात्र सर्वांसमोर एवढ्या कॅमेऱ्यासमोर काजोलला गालावर किस्स केले. त्यानंतर करणने किस्स केले असे म्हणत त्या दोघांच्या फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

या व्हायरल व्हिडीओनंतर नेटकाऱ्यांनी करणला ट्रोल करण्यास सुरुवात केली. कारण पार्टी कुणाची आणि चर्चेत कोन येत आहे यावरून “बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना असे म्हणत नेटकाऱ्यांनी त्या व्हायरल व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया दिली.

महत्वाच्या बातम्या: 

‘आमदार निवास’मध्ये सनी लिओनी ‘शांताबाई’ गाण्यावर थिरकणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण

विद्यार्थ्याने १०१ वेळा चाकू भोसकून केली शिक्षिकेची हत्या; कारण ऐकून पोलिसही हैराण

जनतेने आम्हाला १०५ जागा दिल्या, तुम्ही पावसात भिजूनही त्याच्या अर्धेही निवडून आमदार आले नाहीत”

सापापेक्षाही भयानक विषारी आहे ‘हा’ किडा; तोंडात घेताच सापाचाही झाला क्षणात मृत्यू