आता २४ वर्षांनंतर करणने सगळ्यांच्या आवडत्या चित्रपटाचा रिमेक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याने ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटाच्या रिमेकसाठी कलाकारांचाही विचार केला आहे. एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत करण जहरने सांगितले की, मला रणवीर सिंगला शाहरुख खानच्या भूमिकेत, आलिया भट्टला काजोलच्या भूमिकेत आणि जान्हवी कपूरला राणी मुखर्जीच्या भूमिकेत बघायचे आहे.
जान्हवी सर्वोत्तम कामगिरी करेल कारण ती एका कॉलेज तरुणीची आणि हॉट मुलीची भूमिका तशाच प्रकारे साकारू शकणार आहे. यासोबतच करण जोहरला विचारण्यात आले की, त्यांची मुले मोठी झाल्यावर त्यांना त्यांच्यासाठी कोणता चित्रपट बनवायला आवडेल? यावर करण जोहर म्हणाला की, आजचे युग पाहता मला वाटते की मुले खूप विकसित झाली आहेत आणि मी फक्त त्यांच्यासाठी चित्रपट बनवणार नाही. मी एक हॅप्पी फिल्म बनवणार आहे कारण मुलांना फक्त आंनद द्यायला हवा.
तर दुसरीकडे करण जोहरचा टॉक शो कॉफी विथ करणने दस्तक दिली आहे. शोचे पहिले पाहुणे आलिया भट्ट आणि रणवीर सिंग होते. दोघांनीही शोमधील अनेक गोष्टींवरून पडदा उचलला तसेच अनेक मजेशीर गोष्टी केल्या. दोघांनीही त्यांच्या लग्नाबाबत चर्चा केली. या दोघांनीही त्यांचा हनिमूनचा अनुभव कसा होता आणि त्यांनी काय केले हे देखील सांगितले.
करण जोहर रणवीर सिंगसोबत रॅपिड फायर राउंड करत असताना त्याने दीपिका पदुकोणसोबतच्या ‘सुहागरात’बद्दल प्रश्न विचारला. रणवीर सिंग म्हणाला, माझ्या हनिमूनला मी खूप उत्साही होतो. तसेच मी त्यासाठी एक प्लेलिस्ट बनवली होती, जी मी अनेकदा वाजवतो. त्यात काही सुफी आणि क्लासिकल सॉन्ग देखील आहेत.
या प्रश्नावर आलिया भट्ट म्हणाली की, मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते की, हनीमून किंवा फर्स्ट नाईट असे काही नसते. तुम्ही इतके थकलेले असता की त्या वेळी तुम्हाला फक्त झोप येते. रणवीर-आलिया धर्मा प्रोडक्शनच्या रॉकी आणि रानी की प्रेम कहानी या चित्रपटात एकत्र काम करत आहे. तर, करण जोहर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटात आलिया-रणवीरशिवाय धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी देखील दिसणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
आजोबा झाल्यानंतर करण जोहर झाला भलताच खुश, म्हणाला, माझी बेबी आलिया भट्ट
लॉरेन्स बिश्नोईच्या हिट लिस्टमध्ये होते करण जोहरचे नाव, वसूल करणार होता एवढ्या कोटींची खंडणी
KGF बद्दल करण जोहरचं मोठं वक्तव्य, म्हणाला, आम्ही असा चित्रपट बनवला असता पण
अजूनही लग्न न झाल्याने करण जोहर झाला निराश, वैयक्तिक आयुष्याबद्दल केला मोठा खुलासा