बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर नेहमीच चर्चेत असतो. तर आता करण जोहरची वाढदिवसाची पार्टी चर्चेत आली आहे. नुकताच करण जोहरने २५ मे रोजी त्याचा ५० वा वाढदिवस दणक्यात साजरा केला. ५० व्या वाढदिवसानिमित्तानं करणनं यशराज स्टु़डिओमध्ये ग्रँड पार्टी ठेवली होती.
करण जोहरच्या वाढदिवसाची पार्टीला रणबीर कपूर, आलिया भट्ट, दीपिका पादुकोण, शाहरुख खान यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार सहभागी झाले होते. करण जोहरच्या खास मैत्रिणींपैकी दोन म्हणजे राणी मुखर्जी आणि काजोल यांनी आपल्या या खास मित्राच्या वाढदिवसाला हजेरी लावली होती.
त्याचबरोबर इतर क्षेत्रातील अनेक नामवंत मंडळी देखील सहभागी झाली होती. करण जोहरच्या पार्टीत शाहिदनं पत्नी मीरासोबत आणि करिनानं पती सैफसोबत घेतलेली एन्ट्री लक्षवेधी ठरली. मात्र अशातच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. करण जोहरच्या वाढदिवसाची पार्टीतील तब्बल ५५ जणांना करोनाची लागण झाल्याच समजत आहे.
करण जोहरच्या पार्टीतील तब्बल ५५ जणांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. याचबरोबर मिळालेल्या माहितीनुसार, करण जोहरच्या पार्टीमध्ये सहभागी झालेल्या बॉलिवूड सेलिब्रेटींमधील जवळपास ५०-५५ जणांना करोनाची लागण झाली आहे.
मात्र आता यातील नेमक्या कोणत्या सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाली आहे याची माहिती अद्याप मिळाली नसून पार्टीतील 55 जणांची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे दिसुन आले आहे. यामुळे आता सर्वत्र करण जोहरच्या वाढदिवसाची पार्टी चर्चेचा विषय बनली आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी करण जोरहच्या घरी झालेल्या एका पार्टीमध्ये अभिनेत्री करिना कपूर, मलायका अरोराची बहिण अमृता अरोरा यांना कोरोना झाला होता. त्यानंतर मुंबई महानगर पालिकेनं त्यांच्यावर कारवाईचे आदेशही दिले होते. आताही करणची पार्टी पुन्हा चर्चेत आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
अवेळी फोन करणाऱ्यांवर वसंत मोरे भडकले; म्हणाले, ‘नेत्यालाही घरदार संसार असतो..’
‘मी घरी बसेन पण अन्य कुठल्या पक्षाचा झेंडा हाती घेणार नाही, शिवसेना माझ्या घरात, माझ्या मनात’
शंकर महादेवननी सांगितल्या जवळचा मित्र केकेच्या आठवणी; वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल
‘पृथ्वीराज’ चित्रपट पाहील्यावर मोहन भागवतांनी दिली प्रतिक्रीया; म्हणाले आता आपण इतिहासाकडे….