Share

सरन्यायाधीश म्हणाले ‘शिंदेगट बुद्धीबळासारखा खेळला’; सिब्बल म्हणाले तुमच्या पाया पडतो पण…

eknath shinde kapil sibbal

सर्वोच्च न्यायालयात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट हे प्रकरण पाहायला मिळत आहे. या सत्तासंघर्षामध्ये दोन्ही गटाकडचे वकील आपआपल्या पद्धतीने युक्तिवाद करत आहे. आज या सुनावणीचा तिसरा दिवस असून पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे जोरदार युक्तिवाद केला जात आहे.

अशात दोन्ही गटांचा युक्तिवाद सुरु असताना सरन्यायाधीशांनी महत्वाचं विधान केलं आहे. शिंदे गटाकडून बुद्धिबळाच्या खेळीप्रमाणे पुढची खेळी ओळखली गेली.पुढे काय होणार हे शिंदे गटाला माहिती होतं, असे विधान सरन्यायाधीशांनी केले आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल युक्तिवाद करण्याआधीच न्यायाधीशांनी असे म्हटले आहे.

घटनेच्या दहाव्या सुचीमध्ये बहुसंख्य-अल्पसंख्यांक ही संकल्पना नाही. त्यामुळे तुम्ही बहुसंख्य असलात तरी तुम्ही अपात्र आहात. त्यामुळे आम्ही ३४ आहोत असे म्हणण्यात काही अर्थ नाही. यामध्ये एकच मार्ग आहे तो म्हणजे दुसऱ्या पक्षात विलीणीकरण, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.

तसेच पुढे ते म्हणाले की, शिंदे गटाला पुढच्या अनेक गोष्टी माहिती होत्या. त्यामुळेच त्यांनी विधानसभा उपाध्यक्षांविरोधात अविश्वासाची नोटीस दिली होती. घटनेच्या दहाव्या सुचीचा आधार घेऊन हे सरकार पाडण्यासाठी मार्ग तयार करुन देऊ नका.

हे प्रकरण सध्या पुरतं मर्यादीत राहिलेलं नाही. यापुढील काळातही अशी प्रकरणे उद्भवू शकतात. १० व्या सुचीच्या आधारे देशातील सरकार पाडू नका. हा प्रश्न वेळोवेळी उपस्थिती केला जात आहे. निवडून आलेली सरकारे पाडली जातील. कोणत्याही लोकशाहीला ते परवडणारे नाही. मी तुमच्या पाया पडतो. दहाव्या सुचीच्या आधारावर सरकार पाडू देऊ नका, असा युक्तिवादही कपिल सिब्बल यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-
बागेश्वरबाबाच्या दरबारात कसा चालतो तंत्र-मंत्राचा छुपा खेळ, कशी होते प्रेत दरबारात भूतांना मारहाण; वाचा संपूर्ण कहाणी
मुंबईतील फेमस ‘मुच्छड पानवाला’च्या दुकानावर पोलिसांची धाड; सापडलं भलंमोठं घबाड
चिंचवड पोटनिवडणूकीआधीच भाजपला मोठा धक्का! शहरातील ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now