Share

कपील शर्माचे वर्षानुवर्षे जुने स्वप्न झाले पूर्ण, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत फोटो पोस्ट करत म्हणाला…

आपल्या बोलण्याने इतरांना हसवण्यास भाग पाडणाऱ्या कॉमेडियन कपिल शर्माचे (Kapil Sharma) स्वप्न साकार झाले आहे. खूप दिवसांपासून पाहिलेल्या या स्वप्नाची क्वचितच कोणाला कल्पना होती. पण आता कपिलने स्वतःच त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकून चाहत्यांना सांगितले आहे की, तो ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आला आहे.(Kapil Sharma’s years old dream has come true)

kapil sharma kamal haasan

सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये, ‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवरून, अर्चना पूरण सिंग, कृष्णा अभिषेक, किकू शारदा यांच्यासह साऊथ सुपरस्टार कमल हासन देखील दिसत आहेत. आपल्या सहकलाकारांसोबतचे अनेक फोटो शेअर करत कपिलने कॅप्शनही लिहिले आहे. ‘जेव्हा आपले स्वप्न पूर्ण होते. आमच्या चित्रपटसृष्टीचे दिग्गज श्रीमान कमल हासन यांच्यासोबत खूप छान वेळ घालवला. अप्रतिम अभिनेता आणि महान माणूस देखील. आमच्या शोमध्ये सौंदर्य वाढवल्याबद्दल कमल हसन सरांचे खूप खूप आभार.’ यासोबत कपिलने अनेक इमोजी आणि हॅशटॅगही पोस्ट केले आहेत.

एवढेच नाही तर कपिलने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये कमल हासनसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. यामध्ये दोघेही कॅमेराकडे पाहताना पोज देत आहेत. या पोस्टमध्ये, कॉमेडियनने अभिनेत्याला टॅग केले आणि त्याचे गाणे गायले, ए जिंदगी गले लगा ले. हे गाणे 1983 मध्ये आलेल्या सदमा चित्रपटातील आहे, ज्यामध्ये कमलसोबत दिवंगत अभिनेत्री श्री देवी देखील दिसली होती. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता.

वास्तविक कमल हासनचा चित्रपट येतोय, ज्याचे नाव आहे ‘विक्रम’. हा एक तमिळ चित्रपट आहे. 3 जून रोजी रिलीज होणार आहे. राज कमल फिल्म्स इंटरनॅशनलच्या माध्यमातून कमल हसनने याची निर्मितीही केली आहे. स्वत: अभिनेत्याने त्याच्या ट्विटर हँडलवर चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल सांगितले होते.

हा एक उच्च अॅक्शन-ड्रामा चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन लोकेश कनागराज यांनी केले आहे. या चित्रपटात कमल हसनशिवाय विजय सेतुपती आणि फहद फासिल देखील दिसणार आहेत. जुलै 2021 पासून सुरू झालेल्या या चित्रपटाचे शूटिंग 2 मार्च रोजी पूर्ण झाले. आता तो रिलीजसाठी सज्ज झाला आहे.

महत्वाच्या बातम्या-
कपिल शर्माने तो प्रश्न विचारताच भडकला अजय देवगण, म्हणाला, तुझ्यापेक्षा तर जास्तच नंबर.. 
कसा आहे अजय देवगणचा रनवे 34? वाचा कपिल शर्मापासून रितेश देशमुखपर्यंत सगळ्यांनी दिलेला रिव्ह्यू
विचित्र अवस्थेत रस्त्यावर फिरताना दिसला द कपिल शर्मा शो मधील कॉमेडियन, व्हिडीओ झाला व्हायरल
कपिल शर्मावर आली फुड डिलिव्हरी बॉयचे काम करण्याची वेळ? ‘तो’ फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now