Share

“माझी मुलगी स्वत: १२ तास झोपते आणि मी झोपलो की..”, कपिल शर्माने सांगितला भन्नाट किस्सा

सोनी टीव्हीवरील ‘द कपिल शर्मा शो’ या शोने चाहत्यांचे नेहमीच मनोरंजन केले आहे. या शोने चाहत्यांना खूप हसवले आहे. या शोमध्ये प्रत्येक आठवड्यात कलाकार हे पाहुणे म्हणून हजेरी लावत असतात. आपल्या आगामी प्रोजेक्टच्या प्रमोशनसाठी कलाकार या शोमध्ये येतात. इतकेच नव्हे तर कपिल शर्मा आणि कलाकार हे मस्ती करताना ही दिसून येतात.

 

या शोच्या शनिवारीच्या (१९ फेब्रुवारी) नेहा धुपिया, यामी गौतम आणि अतुल कुलकर्णी या कलाकारांनी हजेरी लावली. हे कलाकार ‘ए थर्सडे’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलेले आहेत. या कलाकारांसोबत कपिलने खूप मस्ती करताना दिसून आला. इतकेच नव्हे तर काही खासगी मजेशीर गोष्टींचा ही खुलासा केला जातो. याच दरम्यान कपिलने त्याच्या मुलीबद्दल काही गोष्टीही सांगितल्या.

 

आपल्या सर्वांचं माहिती आहे की, नेहा धुपियाने काही दिवसांपूर्वीच एका मुलाला जन्म दिला आहे. याबद्दल कपिलने नेहाला शुभेच्छा देखील दिल्या. इतकेच नव्हे तर कपिलने नेहाला बदाम देखील दिले. जेणेकरून ती मुलांना सांभाळून कामाकडे हे लक्ष देऊ शकेल. यावर अतुल कुलकर्णी म्हणाले की, “हे फार लवकर देत नाही का? या बोलण्यावर खिल्ली उडवत कपिल म्हणतो की, मग काय तिसरं मुल झाल्यावर देऊ का? कपिलच्या या बोलण्यानंतर उपस्थित सर्वजण जोरजोरात हसायला लागतात.

या चित्रपटाबद्दल झाले तर, या चित्रपटात यामीने १६ मुलांसोबत काम केले आहे. त्याचबरोबर यामीने या चित्रपटात मुलांसोबत काम करण्याचा अनुभव देखील सर्वांसोबत शेअर केला. ती म्हणाली की, सर्व मुलं खूप हुशार आहेत. यामी असे म्हणताच कपिल तिच्या बोलण्याला सहमत देतो. त्यानंतर तो त्याच्या मुलीबद्दल एक किस्सा शेअर करतो.

 

कपिल म्हणाला की, “माझी मुलगी स्वतः १२ तासांची झोप घेते. तिची झोप झाली की, सकाळी मला उठवायला येते.” तसेच पुढे कपिल म्हणतो की, “शूटिंग शेड्यूलमुळे मी रात्री उशिरा झोपतो. त्यामुळे मला जाग नाही येत. मग रोज सकाळी अनायरा येऊन मला म्हणते पापा उठ.”

 

कपिलचे हे बोलणे ऐकल्यानंतर परीक्षक अर्चना पूरण सिंह कपिलला विचारते की, “यावर तुझी प्रतिक्रिया काय असे?” तेव्हा कपिल म्हणतो की, “मी तिला म्हणतो की तुझी झोप पूर्ण झाली आहे. आता मला माझी झोप पूर्ण करू दे.” आपल्याला माहितीच आहे की, कपिल शर्माला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत. तसेच कपिल हा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. तो नेहमी आपल्या मुलांसोबत फोटो देखील शेअर करत असतो.

 

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now