सोनी टीव्हीवरील ‘द कपिल शर्मा शो’ हा सुपरहिट शो पैकी एक आहे. या शोने अनेक प्रेक्षकांना खूप हसवले आहे. त्याचबरोबर या शोचा होस्ट कॉमेडियन कपिल शर्मा देखील नेहमी चर्चेत असतो. सध्या कपिल शर्मा हा त्याची पत्नी गिन्नी चतरथ सोबत स्पॉट झाला. कपिल आणि गिन्नी ‘गेहेरायान’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला उपस्थित होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन शकुन बत्रा यांनी केले आहे.
या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोण, अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी, अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेता धैर्य करवा हे कलाकार प्रमुख भूमिका आहेत. बुधवारी (९ फेब्रुवारी) चित्रपटाचे स्क्रिनिंग झाले, ज्यामध्ये अनेक कलाकार उपस्थित होते.
तसेच कपिल आणि गिन्नीने प्रीमियरमध्ये पॅपराझींसाठी पोजही दिली. याच दरम्यान कपिलने गिन्नीच्या कपाळावर किस देखील केले. मात्र यावेळी तो स्वतःच खूप लाजला. तसेच गिन्नी देखील हसताना दिसली. त्याचबरोबर या चित्रपटाच्या स्क्रिनिंग दरम्यान कपिल आणि गिन्नी व्यतिरिक्त अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, सोनी राजदान आणि तिची मुलगी शाहीन भट्ट, क्रिती खरबंदा आणि रजत कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी उपस्थित होते.
तसेच दीपिका, अनन्या, सिद्धांत आणि धैर्य हे एकाच कारमधून स्क्रिनिंगला पोहोचले. कारमध्ये ते नुकतेच प्रदर्शित झालेले चित्रपटाचे गाणेही गुणगुणत होते. दीपिकाने कारमधून इंस्टाग्राम लाईव्ह देखील केले होते. हा चित्रपट ११ फेब्रुवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध होणार आहे.
तसेच कपिलबद्दल बोलायचे झाले तर, कपिल आणि गिन्नी नुकतेच नेटफ्लिक्स स्टँडअप ‘आय एम नॉट डन यट’ या शोच्या स्पेशल एपिसोडमध्ये दिसले. त्याचबरोबर साल २०१८ मध्ये दोघांचे लग्न झाले. त्यांना अनायरा आणि त्रिशान ही दोन मुले आहेत.
कपिल शर्माच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो एक स्टँडअप कॉमेडियन आहे. त्याने अनेक शो केले आहे. ‘द कपिल शर्मा शो’ च्या व्यतिरिक्त ‘कॉमेडी नाईटस विद कपिल’, ‘कॉमेडी सर्कस’ हे शो केले आहेत. याचबरोबर त्याने चित्रपटात ही पदार्पण केले आहे. तसेच तो एक निर्माता देखील आहे.
महत्वाच्या बातम्या
शेजारणीच्या घरी गेलेला तरुण बाहेरच आला नाही, दरवाजा उघडून बघताच गावकऱ्यांना दिसले धक्कादायक चित्रं
हिजाबविरुद्ध भगवा वाद चिघळला; कर्नाटकात तीन दिवसांसाठी शाळा कॉलेज बंद
मित्राने सांगितले, तुमची मुलगी ऍडल्ट साईटवर आहे; वडिलांची ‘अशी’ होती प्रतिक्रिया, वाचून धक्का बसेल
मेहुणीशी लग्न करण्यासाठी मित्राला करायला लावली पत्नीची हत्या, नंतर मृतदेहासोबत केले भयानक कृत्य