सोनी टीव्हीवरील ‘द कपिल शर्मा शो’नेहमी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या शोचा होस्ट कपिल शर्माला देखील खूप प्रसिद्धी मिळाली आहे. तसेच कपिल हा मागील अनेक वर्षांपासून या क्षेत्रात आहे. त्याचबरोबर त्याने चित्रपटात देखील आपला हात आजमावला आहे. मात्र पहिलाच चित्रपट त्याचा फ्लॉप ठरला आहे. त्यानंतर त्याने अनेक दिवस कोणत्याही चित्रपटात काम केले नाही.
मात्र सध्या तो त्याच्या करिअरमधील दुसऱ्या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. कपिल त्याच्या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहे. सध्या तो भुवनेश्वरमध्ये शूटिंग करत आहे. नंदिता दासच्या चित्रपटात कपिल एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या भूमिकेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या चित्रपटात कपिल फूड डिलिव्हरी बॉयच्या भूमिकेत दिसणार आहे.
तसेच शुक्रवारी (१८ मार्च) रोजी त्याच्या चाहत्याने कपिलच्या या लूकमधील एक फोटो शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये कपिल बाईकवर केशरी टी-शर्ट घातलेला दिसत आहे. तसेच त्याच्या पाठीवर डिलिव्हरी बॅग दिसत आहे. हा फोटो शेअर करताना चाहत्याने लिहिले की, ‘सर, आज मी तुम्हाला थेट पाहिले.
Sir ji main aaj aapko live dekhliya pic.twitter.com/y9O9vq7R55
— Akash Singh (@AkashSingh178) March 18, 2022
तसेच या चाहत्याच्या पोस्टवर कपिल शर्माने प्रतिक्रिया दिली आहे. कपिल शर्माने फॅन्सची ही पोस्ट रिट्विट करत लिहिले की, ‘कोणाला सांगू नका.’ तसेच इमोजीही पोस्ट केले आहे. तर या पोस्टवर एका चाहत्याने कमेंट केली की, ‘मी यामध्ये कपिलला शोधत होतो. स्विगीचा माणूस कपिल निघाला.’ दुसर्या चाहत्याने लिहिले की, ‘सर, तुम्हाला दुसरी नोकरी सापडली आहे का?’
अलीकडेच कपिल शर्मा आणि नंदिता दास यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची भेट घेतली. ज्याचे फोटो कपिलने सोशल मीडियावर शेअर केले होते. फोटो शेअर करत कपिलने लिहिले की, ‘ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना भेटून खूप आनंद झाला.’
कपिलने नुकताच त्याचा बाईकवरील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये तो सकाळी बाईक चालवताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत कपिलने लिहिले की, ‘मी सकाळी माझ्या आवडत्या बाईकवर फिरण्याचा आनंद घेत आहे.’ या व्हिडिओमध्ये कपिल त्याच्या चित्रपटातील भूमिकेत दिसत आहे. तसेच त्याने मिशा देखील लावल्या आहेत.