Share

राजकारणात येण्यासाठी तयार आहात का? कपिल देवचे उत्तर ऐकून तुम्हीही कराल कौतुक

भारतीय क्रिकेट संघाच्या महान कर्णधारांपैकी एक असलेले विश्वचषक चॅम्पियन कपिल देव यावेळी चर्चेत येत आहेत. मीडियामध्ये सुरू असलेल्या बातम्यांनुसार ते आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश करणार आहे. जेव्हा कपिल यांना या बातम्यांबाबत विचारण्यात आले तेव्हा त्यांनी या निव्वळ अफवा असल्याचे म्हटले. असा कोणताही हेतू नसल्याचे त्यांनी सांगितले.(Kapil Dev, World Cup Champion, Aam Aadmi Party)

कोणत्याही पक्षात सामील होण्याच्या वृत्ताचा इन्कार करत कपिल देव म्हणाले, मी एका राजकीय पक्षात सामील झाल्याच्या बातम्या ऐकल्या आहेत. हे पूर्णपणे असत्य आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. सोशल मीडियावर कपिल देव यांनी लिहिले की, लोक अशा खोट्या बातम्या पसरवत असल्याने मी खूप निराश झालो आहे. जर मला कधी एवढं मोठं पाऊल उचलावं लागलं  तर मी याची घोषणा केली असती.

लक्षात घेण्यासारखे आहे की, यापूर्वी कपिल देव आम आदमी पार्टीमध्ये सामील होणार असल्याची माहिती समोर येत होती. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या भेटीचे फोटोही समोर आले आहे. तसेच काही महिन्यांपूर्वीच, अनुभवी भारतीय फिरकी गोलंदाज हरभजन सिंगला आम आदमी पक्षाने पंजाबमधून राज्यसभेचे उमेदवार बनवले आहे.

कपिल देव यांनी भारतासाठी पहिला विश्वचषक जिंकला. १९८३ मध्ये टीम इंडियाने वेस्ट इंडिजसारख्या बलाढय़ संघाला हरवून विश्वचषक ट्रॉफी जिंकली होती. एकदिवसीय विश्वचषक जिंकून भारताचे नाव संपूर्ण जगात कर्णधाराने आणि त्याच्या संघाने रोशन केले. या विश्वचषकात भारतीय संघ पराभवाच्या उंबरठ्यावर असताना कपिलने झिम्बाब्वेविरुद्ध १७५ धावांची ऐतिहासिक खेळी केली.

कपिल देव हे भारतीय क्रिकेट संघाचे पहिले कर्णधार आहेत ज्यांनी संघाला विश्वचषक मिळवून दिला. यासह कपिल देव यांनी भारताचे प्रतिनिधित्व करताना २२५ एकदिवसीय सामने आणि १३१ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांनी फलंदाजी करताना अनुक्रमे ५२४८ आणि ३७८३ धावा केल्या आहेत. दुसरीकडे, जर आपण गोलंदाजीबद्दल बोललो तर कपिलने कसोटीत ४३४ आणि एकदिवसीय सामन्यात २५३ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-
जडेजाने मोडला कपिल देव यांचा हा विक्रम, ICC च्या ऑल राऊंडरच्या पंगतीत मिळवले पहिले स्थान
मोठ्या कष्टाने एकट्या आईने ६ मुलांना वाढवले आणि देशाला मिळाला कपिल देव सारखा महान खेळाडू
कपिल देवचा ३६ वर्षांपूर्वीचा विक्रम रविंद्र जडेजाने काढला मोडून; ‘हा’ विक्रम करणारा बनला दुसरा भारतीय फलंदाज
VIDEO: पंडितजी म्हणाले असं काही की खळखळून हसू लागली नवरी, निमुटपणे ऐकून घेत होता नवरदेव

 

 

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now