पॅन इंडिया चित्रपट कांतारा (Kantara) बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. कांताराने उत्तम आशयाच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कन्नड भाषेतील पहिल्या रिलीजवर या चित्रपटाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दरम्यान, दक्षिण सुपरस्टार ऋषभ शेट्टीचा कांतारा हा चित्रपट 14 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाल्यापासून चांगली कामगिरी करत आहे.Kantara, Rishabh Shetty, Box Office, Collection,KGF
महत्वाची गोष्ट म्हणजे रिलीजच्या दुस-या दिवशी कांताराच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये मोठी वाढ झाली आहे. विक्रम वेधा आणि पौन्नियां सेल्वन 1 सारख्या मोठ्या चित्रपटांसह प्रदर्शित झालेल्या कांताराने चाहत्यांच्या हृदयावर वेगळी छाप सोडली आहे. या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
ऋषभ शेट्टी स्टारर कांतारा या चित्रपटाचे सगळेच कौतुक करत आहेत. दरम्यान, रविवारी ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी कांतारा या हिंदी व्हर्जनच्या बॉक्स ऑफिस कमाईच्या आकड्यांबाबत माहिती दिली आहे. तरणच्या म्हणण्यानुसार, कांताराने हिंदी रिलीजनंतर दुसऱ्या दिवशी एकूण 2.75 कोटी कमावले आहेत. जे ओपनिंग दिवसापेक्षा जवळपास दुप्पट आहे.
कांताराने हिंदी रिलीजच्या पहिल्या दिवशी 1.27 कोटींची कमाई केल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत आता कांताराचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 4.02 कोटी झालं आहे. येत्या काळात कांतारा यांच्या कमाईचा आलेख खूप उंचावणार आहे. तसेच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी प्रचंड प्रेम पाहायला मिळत आहे.
हिंदी आवृत्तीपूर्वी कांताराने कन्नड भाषेत बरेच यश मिळवले आहे. केजीएफच्या निर्मात्यांचा कांतारा हा 16 कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. पण या चित्रपटाने बजेटनुसार बंपर कमाई केली आहे. तसेच KGF 2चे रेकोर्डही तोडले आहे. कांताराचे जगभरातील कलेक्शन 100 कोटींच्या पुढे जाणार आहे. रिपोर्टनुसार, या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 91 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
Poniyin Selvan: विक्रम वेदाच नाही तर रजनीकांतच्या चित्रपटांनाही PS-1 ने टाकले मागे, कमावले तब्बल ‘एवढे’ कोटी
Sonia Gandhi: ‘हा’ नेता आहे सोनिया गांधींचे ATM; भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या गंभीर आरोपांनी खळबळ
लता मंगेशकर आपल्या मागे सोडून गेल्यात तब्बल ‘इतक्या’ कोटींची संपत्ती; कार्स कलेक्शन पाहून बसेल धक्का