Share

Sajid Khan: ‘दिया और बाती हम’ फेम अभिनेत्रीचा साजिद खानवर गंभीर आरोप; म्हणाली, मला टॉप वर करून…

Bigg Boss, Sajid Khan, Kanishka Soni, Sherlyn Chopra/ बिग बॉस 16 मध्ये साजिद खान आल्यानंतर त्याची जुनी प्रकरणे पुन्हा उजेडात येऊ लागली आहेत. शर्लिन चोप्रानंतर आता दिया और बाती फेम कनिष्का सोनीची पोस्ट चर्चेत आहे. कनिष्काने एका लांबलचक पोस्टसोबत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. चित्रपटात भूमिका देण्याच्या नावाखाली ज्या व्यक्तीने तिचा टाॅप वर केला होता त्याचे नाव सांगण्यास ती घाबरते, असे या पोस्टमध्ये लिहिले आहे. कनिष्काने सांगितले की, तिला कळाले तो दिग्दर्शक बिग बॉसमध्ये आला आहे.

कनिष्काने सांगितले की, त्या दिग्दर्शकाचे नाव साजिद खान आहे. मी त्याला 2008 मध्ये भेटले. त्यावेळी मी 2 रिअॅलिटी शो केले होते. मुंबईत टिकून राहण्यासाठी मी निर्माते-दिग्दर्शकांच्या मुलाखती घ्यायचे. त्यानंतर माझा साजिद खानशी संपर्क झाला. साजिदला फोन केला असता त्याने साजिद  बंगल्यावर इंटरव्यूसाठी बोलावले होते.

ती पुढे म्हणाली, त्यावेळी माझी कारकीर्द नुकतीच सुरू झाली होती. मी जून 2008 मध्ये त्याला भेटले. त्यानंतर मी साजिद खानला फोनवर सांगितले की, मला अभिनयात करिअर करायचे आहे.  चित्रपटात भूमिका देण्याविषयी विचारले होते. साजिदशी एक-दोनदा फोनवर बोलल्यानंतर साजिदने तिला जुहू येथील फ्लॅटवर भेटायला ये, असे सांगितले.

ती पुढे म्हणाली, मी अहमदाबादहून आले होते, मी एक लाजाळू मुलगी होते. तो मला म्हणाला की, तू घाबरू नकोस. मी माझ्या आईसोबत राहतो. घरी इतर लोक आहेत. कामगारही आहेत. मी त्याच्या घरी गेले. मी माझी पोर्टफोलिओ फाईल घेऊन त्याच्या घरी गेले. पायऱ्या चढून वर गेले. डावीकडे त्याच्या आईची खोली होती. उजवीकडे स्वयंपाकघर होते. कामगारांनी मला साजिद खानच्या खोलीत पाठवले.

साजिदशी काही गप्पा-गोष्टी झाल्या. साजिद म्हणाला उभी राहा. फिगर पाहिली आणि म्हणाला तू परफेक्ट मटेरियल आहेस आणि मी एक फिल्म बनवतोय, ज्यामध्ये मी दीपिका पदुकोणला घेत आहे. मग तो मला म्हणाला, मला तुझे पोट बघायचे आहे. काळजी करू नका, मी स्पर्श करणार नाही. मी म्हणाले, सर तुमच्याकडे पोर्टफोलिओ आहे.

मी हात जोडून म्हणाले, मला पोट दाखवता येणार नाही. यानंतर तो म्हणाला की, मी तुला चित्रपटात घेऊ शकत नाही. सलमान खानला तिचा आवडता असल्याचे सांगून कनिष्काने प्रश्न उपस्थित केला आहे की, बिग बॉसची निवड करण्यापूर्वी लोक त्यांची पात्रता पाहात नाहीत का?

महत्वाच्या बातम्या-
Salman Khan : बिग बॉससाठी १ हजार कोटीचे मानधन घेणार? सलमान खान म्हणाला, १ हजार कोटी मिळाले…
Bigg Boss: कपिल शर्मा शो सोडल्यानंतर ‘या’ स्टारने धरला सलमानचा हात, आता बिग बॉस १६ मध्ये घालणार धुमाकूळ
Kiran mane : २०२२ मधील सर्वात वादग्रस्त अभिनेत्याची बिग बॉसच्या घरात एन्ट्री; म्हणाला, तिथं भांडणार, वाद घालणार आणि…

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now