Share

कंगनाच्या धाकडची वाईट अवस्था, 8 व्या दिवशी कमावले फक्त ‘एवढे’ हजार, विकली गेली 20 तिकीटं

कंगना राणौतचा अॅक्शन चित्रपट ‘धाकड’ ची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. या चित्रपटाने 8 दिवसांत केवळ 3 कोटींची कमाई केली आहे. आठवा दिवस चित्रपटासाठी अत्यंत निराशाजनक ठरला. चित्रपटाच्या आठव्या दिवशी देशभरात केवळ 20 तिकिटे विकली गेली.(kanganas-dhakad-earned-rs-4420-on-the-8th-day-only-20-tickets-were-sold)

चित्रपटाने आठव्या दिवशी केवळ 4420 रुपयांची कमाई केली आहे. हो तुम्ही बरोबर वाचले. आठव्या दिवशी हा चित्रपट केवळ 4420 रुपयांची कमाई करू शकला. वृत्तानुसार, दुसऱ्या शुक्रवारी चित्रपटाची देशभरात फक्त वीस तिकिटे विकली गेली. त्यानंतर हा चित्रपट चित्रपटगृहांमधून काढून टाकण्यात आला आहे.

चित्रपटापूर्वीचे अनेक शो रद्द करण्यात आले होते. धाकड(Dhaakad) हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडा महिला नेतृत्वाचा चित्रपट आहे. तोट्याबद्दल बोलायचे झाले तर हा आजपर्यंतचा सर्वात मोठा तोटा सहन करणारा चित्रपट ठरला आहे. रिपोर्ट्सनुसार हा चित्रपट केवळ 3 कोटींचा व्यवसाय करू शकला.

वीकेंडचा परफॉर्मन्स इतका खराब होता की बहुतेक ठिकाणी सोमवारपासूनच चित्रपट बंद करण्यात आला होता. आठवडाभरात मुंबईतील सर्व चित्रपटगृहांमधून हा चित्रपट हटवण्यात आला आहे. बॉक्स ऑफिसवर(box office) सपशेल फ्लॉप झाल्यामुळे चित्रपटाच्या ओटीटी आणि सॅटेलाइट राइट्स डीलवर थेट परिणाम झाला आहे.

रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाच्या सुपर फ्लॉपनंतर आता त्याचे ओटीटी आणि सॅटेलाइट राइट्सही विकले जात नाहीत. कारण, निर्मात्यांना खरेदीदार मिळत नाही. वृत्तानुसार, बॉक्स ऑफिसवर ‘धाकड’च्या खराब प्रदर्शनानंतर या चित्रपटाचे अनेक शो रद्द करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत आता चित्रपटाच्या निर्मात्यांना ओटीटीवर स्थान मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागणार आहे.

कोणत्याही चित्रपटाचे ओटीटी आणि सॅटेलाइट हक्क चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी विकले जातात. चॅनेल किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवर हक्क विकल्यानंतर निर्मात्यांना कमाईतून चांगला नफा मिळतो. मात्र ‘धाकड’च्या बाबतीत असे काही घडलेले नाही. ‘धाकड’ हा कंगनाच्या(Kangana Ranaut) करिअरमधील सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट ठरला आहे.

वृत्तांवर विश्वास ठेवला तर, सुमारे 100 कोटींच्या बजेटमध्ये ‘धाकड’ बनवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत निर्मात्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रजनीश घई(Rajneesh Ghai) दिग्दर्शित हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट 20 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. कंगनाशिवाय या चित्रपटात अर्जुन रामपाल, दिव्या दत्ता आणि शाश्वत चॅटर्जी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात कंगना एजंट अग्नीच्या भूमिकेत दिसत आहे.

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now