अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) तिच्या बोल्ड आणि बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते. कंगना तिच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत असते किंवा ती वादात राहते. येथे आम्ही तुम्हाला कंगनाशी संबंधित अशाच काही वादांबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये बॉलीवूड स्टार अजय देवगणचेही (Ajay Devgan) नाव समोर आले होते.(Kangana, who loves Ajay Devgan dearly)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजय देवगण आणि कंगना रनौत ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान खूप जवळ आले होते. बातमीनुसार, त्यावेळी अजय आणि कंगना यांच्यात रोमान्स जोरात सुरू होता. या दोघांच्या अफेयरची चर्चा याआधीही अनेकवेळा ऐकायला मिळाली आहे.
हे प्रकरण इतके वाढले होते की, अजय देवगणने कंगनाला ‘रास्कल’ आणि ‘तेज’ सारखे चित्रपट मिळवून देण्यासाठी मदत केली होती. ‘तेज’ हा चित्रपट आधी विद्या बालनला ऑफर करण्यात आला होता, जो नंतर अजयच्या सांगण्यावरून कंगनाला देण्यात आला होता, असे म्हटले जाते.
तथापि, अजय आणि कंगना यांच्या नात्यात एक वेळ अशी आली होती जेव्हा कंगना अजयबद्दल आवश्यकतेपेक्षा जास्त पझेसिव्ह आणि इमोशनल होत होती. असे म्हटले जाते की, तेव्हापासून अजय देवगणने या अभिनेत्रीसोबत अंतर निर्माण करण्यास सुरुवात केली आणि दोघांमध्ये ब्रेकअप झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका मुलाखतीदरम्यान अजयवर निशाणा साधताना कंगनाने एका विवाहित पुरुषासोबत राहून मोठी चूक केल्याचेही म्हटले होते. कारण या दोघांच्या अफेअरबद्दल ऐकून अजयची पत्नी काजोलही हैराण झाली होती.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कंगना राणौतचा याआधी थलाइवी हा चित्रपट रीलीज झाला होता. या चित्रपटाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. थलाइवीपूर्वी कंगनाचा ‘पंगा’ आणि ‘जजमेंटल है क्या’ हे चित्रपटही विशेष चमत्कार दाखवू शकले नाहीत. अशा परिस्थितीत कंगनाला तिच्या चित्रपटाकडून खूप आशा आहेत. आता कंगनाचा ‘धाकड’ चित्रपट २० मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. कंगनाची निर्मिती असलेला टिकू वेड्स शेरू हा चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
आपल्या वेदांची कॉपी आहे एवेंजर्स, कंगना राणावतने हॉलिवूडच्या सुपरहिरोंवर उपस्थित केले प्रश्न
थॅंक्स सलमान, आता मला कधीच एकटं वाटणार नाही कंगना असं का म्हणाली? हे आहे कारण
कंगना आता थेट बॉलिवूडवरच बरसली; म्हणाली, ईद पार्टीत सगळ्यांनी धाकडचे कौतुक केले पण..
VIDEO: धाकड चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज; चाहते म्हणाले,कंगना फायर आहे, बॉलिवूडला आग लावणार