अभिनेत्री कंगना राणौत तिच्या उत्कृष्ट अभिनय आणि वादग्रस्त प्रतिमेसाठी ओळखली जाते. बातम्यांनुसार, अभिनेत्री कंगना रणौतचे नाव अनेक स्टार्ससोबत जोडले गेले आहे. ज्यामध्ये अध्ययन सुमन, आदित्य पांचोली आणि हृतिक रोशन यांचाही समावेश आहे. असे म्हटले जाते की, कंगनाचे नाव सर्वप्रथम प्रसिद्ध अभिनेता आदित्य पांचोलीसोबत जोडले गेले होते.(Kangana was living in a live-in with the actor at the age of 17)
कंगना आणि आदित्यने त्यांचे नाते उघडपणे स्वीकारले होते. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, आदित्य कंगनापेक्षा 22 वर्षांनी मोठा आहे आणि त्याचे लग्नही झाले होते. असे असूनही कंगना आणि आदित्य एकमेकांच्या प्रेमात होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आदित्य पांचोली आणि कंगना 2004 मध्ये एकमेकांना भेटले होते.
दोघे लवकरच एकमेकांच्या प्रेमात पडले आणि एकत्र राहू लागले. कंगना जेव्हा इंडस्ट्रीत आपलं करिअर करत होती, तेव्हा ती आदित्य पांचोलीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. कंगनाने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यावेळी ती अल्पवयीन होती आणि आदित्यने तिला कसे अडकवून ठेवले होते. आदित्य हा कंगनापेक्षा फक्त वयाने मोठाच नाही तर विवाहितही होता.
कंगना आणि आदित्यच्या नात्याची बातमी आदित्य पांचोलीची पत्नी जरीना वहाब हिलाही कळली होती. आदित्य आणि कंगना यांचे नाते फार काळ टिकले नाही. दोघांचे नातेही खूप वादग्रस्त होते. ब्रेकअपनंतर दोघांनी एकमेकांवर अनेक गंभीर आरोपही केले होते. त्याचवेळी या परिस्थितीत सर्व काही जाणून घेतल्यानंतरही जरीनाने पती आदित्यला साथ दिली होती.
कंगना म्हणाली होती, ते दोघे पती-पत्नीसारख्या नात्यात होते. यारी रोडवर आम्ही स्वतःसाठी घरही प्लॅन करत होतो. आम्ही मित्राच्या घरी तीन वर्षे एकत्र राहिलो. कंगनाने सांगितले होते की, ती वापरत असलेला फोनही आदित्य पांचोलीचा होता. कंगनाने आदित्यवर मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता. नंतर अभिनेत्याने कंगनावर खोटे आरोप केल्याबद्दल कायदेशीर कारवाई केली.
एकदा आदित्यने कंगनावर हात उचलला होता आणि जेव्हा आदित्य कंगनाला त्रास देत होता तेव्हा कंगनाने आदित्यची पत्नी जरीनाकडे मदत मागितली पण तिने मदत करण्यास साफ नकार दिला. एकदा कंगनाने एक मोठा खुलासा केला होता की तिला आदित्यने घरात बंद केले होते आणि त्यावेळी माझ्याकडे पहिल्या मजल्यावरून खिडकीतून उडी मारण्याशिवाय पर्याय नव्हता. दुसरीकडे आदित्यने कंगनाबद्दल सांगितले होते की कंगना वेडी आहे आणि अभिनेत्याने कंगनाने त्याचा वापर केल्याचा आरोप केला होता.
आदित्यने अभिनेत्रीला कायदेशीर कारवाईची धमकी दिली होती. या घटनेनंतर कंगनाने 20 वर्षांने मोठ्या आदित्यसोबतचे नाते कायमचे तोडले. कंगनासोबतच्या रिलेशनशिप अगोदरच आदित्यचे लग्न झाले होते. अभिनेत्री जरीना वहाब त्याची पत्नी आहे. याशिवाय आदित्य दोन मुलांचा पिता आहे.
महत्वाच्या बातम्या-
महाशिवरात्रीच्या निमित्ताने या अभिनेत्रीने धारण केला अर्धनारीश्वरचा अवतार; लोकं हात जोडत म्हणाले
चॅलेंज! या फोटोतील बिबट्या शोधून दाखवा, ९९ टक्के लोकं झालेत फेल
आम्हाला काहीच नको फक्त येथून बाहेर काढा, पाणावलेल्या डोळ्यांनी पुण्यातील विद्यार्थ्याने सांगितली आपबीती
राणे पिता- पुत्रांना होणार अटक? दिशा सालियनप्रकरणी पोलिसांकडून नोटीस