Share

शाहीदसोबतची ती रात्र खूपच त्रासदायक गेली; कंगणाने दिलेल्या जाहीर कबुलीने उडाली खळबळ

बॉलिवूड क्विन कंगणा रणावत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी सोशल मिडीयावर चर्चेत असते. परंतु सध्या कंगणा रणावत एका वेगळ्याच कारणामुळे लोकांच्या चर्चेत आली आहे. नुकताच कंगणा रणावतने अभिनेता शाहिद कपूरसोबत घडलेला आपला एक किस्सा सर्वांना सांगितला आहे. हा किस्सा एकून कंगणाचे चाहते पोट धरुन हसले आहेत.

एका मुलाखतीत बोलताना कंगणाने सांगितले की, ‘रंगून सिनेमाचं शुटिंग सुरू होतं. शुटिंगनंतर सर्वांना एका ठिकाणी राहायचं होतं. पण राहण्यासाठी खोल्यांची संख्या कमी असल्यामुळे मला आणि काही क्रू मेंबर्सना एकाच खोलीत राहावे लागले.’

‘या खोलीत शाहीद सुध्दा राहिला आला होता. परंतु आल्यानंतर तो झोपला नाही. रात्रभर शाहीद गाणी गात बसला. त्यामुळे मी अस्वस्थ झाले. माझी ती रात्र खूप त्रासदायक ठरली.’ कंगनाचे सांगितलेला हा किस्सा सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाला आहे.

नेटकऱ्यांनी कंगणाचा हा किस्सा ऐकून तीला अनेक वेगवेगळे प्रश्न विचारले आहेत. शाहीद गाणी गात कसा होता? तु कानात कापूस घालून का झोपली नाही? अशा प्रतिक्रिया कंगणाला मिळाल्या आहेत. तर काहींनी हा किस्सा ऐकून त्याच्यावर मिम्स देखील बनवले आहेत.

दरम्यान कंगणा रणावत लवकरच ‘तेजस’, ‘टिकू वेड्स शेरू’, ‘धाकड’ सारख्या चित्रपटात दिसणार आहे. सध्या ती याच चित्रपटांच्या शुटींगमध्ये व्यस्थ झाली आहे. परंतु काही दिवसांपूर्वीच कंगणाने द कश्मिर फाईल्स चित्रपटावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

कंगणाने म्हटले आहे की, हा चित्रपट फक्त एक कंटेन्ट नसून व्यवसायाचे एक उदाहरण आहे. या चित्रपटाला मिळालेल्या नफ्यावर ही आपण विचार करायला हवा. मात्र असे असले तरी द कश्मिर फाईल्स चित्रपट या वर्षांतील सर्वांत यशस्वी आणि नफा कमवणारा चित्रपट ठरेल.

महत्वाच्या बातम्या
सुनावणी सुरू असताना महिला कोर्टाबाहेरच झाली टॉपलेस, कारण वाचून चक्रावून जाल
हे आव्हान पूर्ण करताना भल्या-भल्यांना घाम फुटला; तुम्हीही प्रयत्न कराल का?
अजब! धुलवडीच्या दिवशी जावयाची निघते गाढवावरून वरात, ‘या’ गावातील प्रथेची पुर्ण देशात चर्चा
IPL 2022: रवि शास्त्रींची सुरेश रैनासोबत धमाकेदार एन्ट्री, आयपीएलमध्ये सांभाळणार मोठी जबाबदारी

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now