गेल्या आठवड्यात कंगना राणौतचा ‘धाकड’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा भारतातील पहिला महिला-केंद्रित बिग बजेट अॅक्शन चित्रपट म्हणून ओळखला जातो. हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला मात्र त्याला बॉक्स ऑफिसवर कमाईसाठी संघर्ष करावा लागत आहे. परिस्थिती अशी आहे की, देशभरातील अनेक चित्रपटगृहांना ‘धाकड’चे शो रद्द करून त्यासोबत रिलीज झालेला ‘भूल-भुलैया 2’ चालवावा लागला आहे.
‘धाकड’मध्ये कंगना रणौत एजंट अग्निच्या भूमिकेत आहे. तिचे फाईट सीन्स आणि गेटअपही प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचू शकत नाहीत. या चित्रपटात अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता यांच्याही भूमिका आहेत. सुमारे १०० कोटींमध्ये बनलेला ‘धाकड’ ३ दिवसात केवळ ३.२२ कोटी कमवू शकला आहे. देशभरात सुमारे २००० स्क्रीन्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची अवस्था इतकी वाईट आहे की प्रेक्षक चित्रपटगृहात बघायला मिळत नाहीत.
या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ ५० लाखांची कमाई केली होती. प्रदर्शनापूर्वी चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग नगण्य होते. ओपनिंग डेला थिएटरमध्ये फक्त १० टक्के जागा भरलेल्या मिळाल्या. सहसा वीकेंडला चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या काहीशी वाढते. ‘जर्सी’प्रमाणेच यापूर्वी रिलीज झालेल्या ‘रनवे 34’ आणि ‘बच्चन पांडे’ने वीकेंडला चांगली कमाई केली. पण ‘धाकड’चे वीकेंड कलेक्शन केवळ ९७ लाखांच्या आसपास राहिले.
रिपोर्टनुसार, देशातील अनेक चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या कमतरतेमुळे ‘धाकड’ चित्रपटगृहांमधून हटवण्यात आला होता. सिंगल स्क्रीनशिवाय अनेक मल्टिप्लेक्समध्ये सरासरी १० ते १५ लोक येत होते. त्यानंतर तेथून ‘धाकड’चे शो रद्द करण्यात आले. मुंबईतील मराठा मंदिरात ‘धाकड’चा शो सुरू होता. मात्र प्रेक्षकांअभावी ते बंद पडले. त्याच्या जागी आता संपूर्ण टाइम स्लॉट कार्तिक आर्यनच्या ‘भूल-भुलैया 2’ या चित्रपटाला देण्यात आला आहे. त्याच वेळी, मुंबईतील प्रसिद्ध थिएटर चेन ‘G7’ ने देखील ‘धाकड’ चित्रपटाचे प्रदर्शन त्यांच्या जागेवरून २५० लोकांच्या क्षमतेच्या थिएटरमध्ये हलवले आहे.
कंगना राणौतच्या शेवटच्या काही चित्रपटांवर नजर टाकली तर आकडे चांगले नाहीत. ‘धाकड’पूर्वी ‘थलायवी’ रिलीज झाला होता. जे. जयललिता यांच्या जीवनावर आधारित या कथेने पहिल्या वीकेंडमध्ये १.०९ कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपट प्रदर्शित झाला तोपर्यंत चित्रपटगृहांमध्ये फक्त ५० टक्के जागा बुक झाल्या होत्या.
याआधी २०१९ मध्ये ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ आला होता. पहिल्या वीकेंडमध्ये याने ३९.५ कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाने एकूण ९०.८ कोटींची कमाई केली होती. याआधी कंगनाचा ‘जजमेंटल है क्या’ हा चित्रपट राजकुमार रावसोबत आला होता. ज्याने ३३.९ कोटींची कमाई केली आणि त्याआधी ‘पंगा’ने एकूण २२.३ कोटींची कमाई केली होती. बॉलीवूड विरुद्ध साऊथचा वाद असो किंवा घराणेशाहीचा वाद असो, कंगना सतत हिंदी चित्रपटसृष्टीला शिव्याशाप देत असते आणि आता तिच्या चित्रपटाला प्रेक्षक मिळत नाहीयेत.
महत्वाच्या बातम्या-
भुल-भुलैया 2 आणि धाकडने बॉलिवूडला आणले पुन्हा रुळावर, पहिल्या दिवशी केली एवढी कमाई
कंगनाचा धाकड देणार का भूल भुलैयाला टक्कर? काय सांगतात ऍडव्हान्स बुकिंगचे आकडे?
महेश बाबूला मिळाला धाकड कंगनाचा पाठिंबा, म्हणाली, त्याच्या पिढीने तेलुगू चित्रपट उद्योगाला..
VIDEO: धाकड चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज; चाहते म्हणाले, कंगना फायर आहे, बॉलिवूडला आग लावणार