बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे माध्यमात नेहमीच चर्चेत असते. कंगना कोणत्याही गोष्टीवर मोकळेपणाने तिचे मत मांडत असते. तिच्या या बिनधास्त अंदाजामुळेच ती नेहमी चर्चेत येत असते. यादरम्यान आता कंगनाने पुन्हा एकदा एका मुद्द्यावर तिचे मत मांडले आहे. सोशल मीडियाद्वारे कंगनाने संरक्षण मंत्रालयाच्या एका निर्णयाचे स्वागत केले (Kangana Ranaut Talks About Women Fighter Pilot)आहे.
नुकतीच केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी घोषणा केली होती की, भारतीय हवाई दलात (IAF) महिला लढाऊ वैमानिकांचा समावेश करण्यासाठी प्रायोगिक योजनेचे कायमस्वरूपी योजनेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राजनाथ सिंह यांनी ट्विटरद्वारे यासंदर्भात घोषणा केली होती. संरक्षण मंत्रालयाच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
यादरम्यान अभिनेत्री कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीला राजनाथ सिंह यांच्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर करत या निर्णयाचे स्वागत केले आहे. पोस्टमध्ये तिने लिहिले की, ‘सरकारचा हा क्रांतिकारी निर्णय आहे. आता आपल्याला अधिक महिला लढाऊ वैमानिक पाहता येणार’.
दरम्यान, कंगनाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास ती सध्या अनेक चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. कंगना मागील वर्षी ‘थलायवी’ या चित्रपटात शेवटची दिसली होती. हा चित्रपट तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि अभिनेत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित होता. यामध्ये कंगनाने जयललिता यांची भूमिका साकारली होती. चित्रपटातील कंगनाच्या अभिनयाचे खूप कौतुक करण्यात आले होते.
लवकरच कंगना ‘तेजस’, ‘धाकड’, ‘मणिकर्णिका रिटर्न्स’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेजस या चित्रपटाचे दिग्दर्शन सर्वेश मेवाडा करत असून यामध्ये कंगना वैमानिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय लवकरच ती ओटीटीवरील एका रिअॅलिटी शोद्वारे डिजिटल डेब्यू करणार आहे.
एकता कपूरच्या अल्ट बालाजी आणि एमएक्स प्लेयर या बॅनरखाली लवकरच एक रिअॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कंगना राणावत या शोचे होस्ट करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
बॉलिवूड अभिनेते अमिताभ यांचं निधन, मृत्यूच्या ४ दिवस आधीचा व्हिडीओ झाला व्हायरल
‘त्या’ चित्रपटादरम्यान महिमा चौधरीसोबत घडली होती भयानक घटना, पूर्ण करिअरच झाले उद्ध्वस्त
तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राचा ‘तो’ व्हिडिओ होतोय व्हायरल; लग्नाबाबत विचारल्यावर म्हणाले..