Share

ऑस्कर, ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याला लता मंगेशकरांचा पडला विसर; संतापलेली कंगना म्हणाली, अशा पुरस्कारांचा..

Grammy Awards

संगीत क्षेत्रातील सर्वात मोठ्या पुरस्कारांपैकी एक असलेला ग्रॅमी पुरस्कार (Grammy Awards) सोहळा नुकताच पार पडला. अमेरिकेतील लास वेगास मधील एमजीएम गँड अॅरिना येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. परंतु, या सोहळ्यात गानसम्राज्ञी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली नाही. त्यामुळे अनेकांनी सोशल मीडियाद्वारे सोहळ्याच्या आयोजकांवर टीका केली. यादरम्यान अभिनेत्री कंगना राणावतनेही यावर आपला संताप व्यक्त केला आहे.

कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीला एक पोस्ट शेअर करत ग्रॅमी पुरस्कारावर टीका केली आहे. तसेच लोकांना या पुरस्काराचा निषेध करण्यास तिने सांगितले आहे. कंगनाने काही बातम्यांचा स्क्रीनशॉट शेअर करत पोस्टमध्ये लिहिले की, ‘स्वतःला आंतरराष्ट्रीय असल्याचा दावा करणारे त्यांच्या विचारसरणीमुळे दिग्गज कलाकारांकडे दुर्लक्ष करतात. अशा कोणत्याही स्थानिक पुरस्काराविरोधात आपण कठोर भूमिका घेतली पाहिजे’.

कंगनाने पुढे म्हटले की, ‘ऑस्कर आणि गॅमीला भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली देण्याचा विसर पडला आहे. जागतिक पुरस्कार म्हणून सांगणाऱ्या पण पक्षपाती करणाऱ्या अशा कार्यक्रमांवर माध्यमांनी बहिष्कार घातला पाहिजे’. दरम्यान कंगनाची ही पोस्ट सध्या माध्यमात चांगलीच चर्चेत आहे.

६४ व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात इन मेमोरिअम सेंगमेंटमध्ये संगीत क्षेत्रातील दिवंगत दिग्गजांना श्रद्धांजली वाहण्यात आली. परंतु, यामध्ये दिवंगत गायिका लता मंगेशकर यांच्या नावाचा समावेश नव्हता. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी याबाबत त्यांची नाराजी व्यक्त करत ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यावर टीका केली.

दरम्यान, कंगनाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास ती सध्या अनेक चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. कंगना मागील वर्षी ‘थलायवी’ या चित्रपटात शेवटची दिसली होती. हा चित्रपट तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि अभिनेत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित होता. यामध्ये कंगनाने जयललिता यांची भूमिका साकारली होती. चित्रपटातील कंगनाच्या अभिनयाचे खूप कौतुक करण्यात आले होते.

लवकरच कंगना ‘तेजस’, ‘धाकड’, ‘मणिकर्णिका रिटर्न्स’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘तेजस’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सर्वेश मेवाडा करत असून यामध्ये कंगना वैमानिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय सध्या ती ‘लॉकअप’ हा शो होस्ट करत आहे. एकता कपूरच्या अल्ट बालाजी आणि एमएक्स प्लेयर या बॅनरखाली या शोची निर्मिती करण्यात आली असून याद्वारे कंगनाने डिजिटल डेब्यू केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
अजय देवगण बनवणार ४०० कोटींची मेगा बजेट फिल्म, वाचा काय होणार त्याचे साईड इफेक्ट्स
VIDEO: करण जोहरने भारती-हर्षच्या मुलाला लॉन्च करण्यास दिला नकार, मग सलमानने घेतला पुढाकार
बॉलीवूडमधील ‘या’ अभिनेत्यामुळे अभिषेक-ऐश्वर्या आले जवळ; नाव वाचून तुम्हालाही बसणार नाही विश्वास   

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now