बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत सध्या ‘लॉकअप’ (Lock Upp) हा रिअॅलिटी शो होस्ट करत आहे. हा शो सुरुवातीपासूनच फार चर्चेत आहे. यामध्ये सहभागी झालेले स्पर्धेक नेहमी त्यांच्यासंबंधित अनेक खुलासे करत प्रेक्षकांना धक्का देत असतात. मात्र, आता या शोमध्ये होस्ट कंगनाने तिच्यासंबंधित एक खुलासा केला आहे. हा खुलासा करताना कंगना खूप भावूकसुद्धा झाली. कंगनाने केलेला हा खुलासा ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.
लॉकअप शोमध्ये स्पर्धक अंजली अरोरा, सायशा शिंदे, आदमा फलाह आणि मुन्नवर फारूकी यांना शोमधून बाहेर न पडण्यासाठी आपला सीक्रेट सांगण्याची संधी देण्यात येते. शोनुसार जो स्पर्धक सुरुवातीला बजर वाजवतो त्याला आपले सीक्रेट सांगावे लागते. परंतु, यावेळी कंगनाने या टास्कमध्ये एक नवा ट्विस्ट आणला.
सीक्रेट सांगण्यासाठी सायशा शिंदे सुरुवातीला बजर वाजवते. पण कंगना म्हणते की, सीक्रेट तिला सांगायचे नाही तर तिला वाचवण्यासाठी इतर स्पर्धकांपैकी एकाला त्यांचा सीक्रेट उघड करावा लागेल. तेव्हा इतर स्पर्धक सायशासाठी त्यांचा सीक्रेट सांगण्यास नकार देतात. पण मुन्नवर सायशाची मदत करण्याचा निर्णय घेतो.
त्यानुसार मुन्नवर फारूकी त्याच्या बालपणीचा एक धक्कादायक खुलासा करतो. मुन्नवर म्हणतो की, ‘आतापर्यंत मी माझा हा सीक्रेट कोणाशीही शेअर केला नाही. पण जेव्हा मी ६ वर्षांचा होतो तेव्हा माझ्यासोबत काही वाईट गोष्टी घडत होत्या. ४-५ वर्षापर्यंत मला काही समजतच नव्हतं. पण नंतर मात्र गोष्टी अधिक वाढत गेल्या, असे सांगत मुन्नवर रडू लागतो.
मुन्नवरने केलेला हा खुलासा ऐकून कंगनासोबत सर्व स्पर्धकही भावूक होतात. त्यानंतर कंगना तिच्या बालपणी तिच्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाचा खुलासा करते. कंगना म्हणते की, ‘दरवर्षी अनेक मुलांना अशाप्रकारच्या गोष्टींमधून जावे लागते. पण लोक सार्वजनिक ठिकाणी याबद्दल बोलण्यास संकोच करतात. लहान वयात अनेक मुलांना वाईट स्पर्शांचा सामना करावा लागतो’.
त्यानंतर कंगनासुद्धा बालपणी लैंगिक शोषणाचा शिकार झाल्याचा खुलासा करते. कंगना म्हणते की, ‘जेव्हा मी लहान होते तेव्हा माझ्यापेक्षा २-३ वर्षांनी मोठा असलेला मुलगा मला वाईट पद्धतीने स्पर्श करायचा. पण लहान असल्याने तेव्हा माझ्यासोबत काय घडत होतं. हे मला कळत नव्हतं. कारण लहान वयातच मुलांना हे सांगण्यात येत नाही की, काय चूक आहे आणि काय वाईट’. कंगना हा खुलासा करताना खूपच भावूक होते.
महत्त्वाच्या बातम्या :
VIDEO : ‘या’ कारणामुळे सलमानच्या हातात सतत असते ‘ते’ लकी ब्रेसलेट, स्वत: सलमानने सांगितला किस्सा
ठाकरेंना नडणाऱ्या राणा दाम्पत्यावर थेट राजद्रोहाचा गुन्हा; विरोधकांसाठी इशारा
मंगेशकर कुटुंबाची उंची किती? आपली उंची किती? बोलतो किती?, भाजपचा आव्हाडांवर हल्लाबोल