अभिनेत्री कंगना राणावतच्या लॉकअप (Lock Upp) या शोमध्ये स्टँडअप कॉमेडियन मुन्नवर फारूकी हा सर्वात चर्चित स्पर्धक आहे. शोमध्ये त्याला खूप पसंती दिली जाते. त्याचे बोलणे, वागणे तसेच विशेष करून अंजलीसोबतचे त्याचे बॉन्डिंग प्रेक्षकांच्या खूप पसंतीस उतरत आहे. यादरम्यान नुकतीच कंगनाने मुन्नवरबाबत एक असा खुलासा केला आहे ज्यामुळे अंजलीला मोठा धक्का बसला आहे.
शोदरम्यान कंगना राणावतने खुलासा केला की, मुन्नवरचे लग्न झाले असून त्याला एक मुलगासुद्धा आहे. तिने सर्व स्पर्धकांना एक ब्लर फोटो दाखवत मुन्नवरबाबत हा खुलासा केला. यासंदर्भात कंगनाने मुन्नवरकडून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता मुन्नवरने याबाबत बोलण्यास नकार दिला. मुन्नवरने म्हटले की, काही गोष्टी न्यायलयाच्या अधीन आहेत. त्यामुळे तो याबाबत जास्त बोलू इच्छित नाहिये.
यावर कंगना त्याला म्हणते की, ‘जर तूला याबाबत काही बोलायचे असल्यास तू बोलू शकतोस. यामुळे तुझी प्रतिमा खराब होणार नाही’. कंगनाच्या या बोलण्यावर मुन्नवर म्हणतो की, ‘त्याचे लग्न खूप लवकर झाले होते. पण तो आणि त्याची पत्नी जवळपास दीड वर्षापासून वेगळे राहत आहेत. तसेच न्यायालयात त्यांच्या घटस्फोटाबाबत कार्यवाही सुरु आहे. त्यामुळे तो यासंदर्भात अधिक बोलू इच्छित नाही’.
मुन्नवरचे हे बोलणे ऐकून सर्व स्पर्धक शांत होऊन बसतात. तर अंजली अरोराला मात्र खूपच हैराण झालेली दिसून येते. कारण नुकतीच अंजलीने मुन्नवरच्या प्रती तिचा प्रेम व्यक्त केला होता. अंजलीने शोदरम्यान मुन्नवरला ‘आय लव्ह यू’ म्हटले होते. अशात आपण प्रेम करणारी व्यक्ती आधीच विवाहित आहे, हे कळताच तिला एकदम धक्काच बसला.
कंगना राणावत शोमधून गेल्यानंतर मुन्नवर फारूकी लॉकअपमधील सर्व स्पर्धकांना सांगतो की, तो शोमध्ये त्याच्या मुलासाठी आला आहे. मागील दोन वर्षापासून तो खूप काही सहन करत आहे. तसेच यासंदर्भात अधिक बोलल्यास त्याच्या मुलावर याचा वाईट परिणाम होईल, त्यामुळे याबाबत बोलणे तो टाळत आहे.
मुन्नवरने म्हटले की, ‘ज्या गोष्टींचा आता काही फरकच पडत नाही त्या गोष्टी आता बाहेर यावे, असे मी इच्छित नाही. मी याबाबत थोडंसं काही बोललो तरी सर्वजण याबाबत संपूर्ण जाणून घेऊ इच्छितात. तसंही या सर्व गोष्टी दोन वर्षापासून मला त्रास देत आहेत’. दरम्यान, मुन्नवरच्या या खुलाशानंतर अंजली यावर कशी प्रतिक्रिया देणार, हे पाहणे औत्सुक्याचे असेल.
महत्त्वाच्या बातम्या :
Video: लॉकअपमध्ये वाहू लागले प्रेमाचे वारे, टिकटॉक स्टार अंजली ‘या’ स्पर्धकाच्या पडली प्रेमात, दिली प्रेमाची कबुली
PHOTO: सलमान खानच्या सनम बेवफामधील हिरोईनमध्ये झालेत खूपच बदल, 30 वर्षांनीही दिसते ग्लॅमरस
मोठ्या पडद्यावर नानांचं पुनरागमन, ‘या’ चित्रपटात साकारणार प्रिन्सिपलची भूमिका, पहा मोशन पोस्टर