मागील अनेक दिवसांपासून कर्नाटकातील एका शैक्षणिक संस्थेतून हिजाब वाद सुरू झाला. हा वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. या वादावर देशभरातील अनेक लोक आपली प्रतिक्रिया देत आहेत. राजकीय नेत्यांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण या विषयावर आपली प्रतिक्रिया मांडत आहेत.
मागील काही दिवसांपूर्वीच अनेक बॉलिवूड कलाकारांनी या वादावर आपली प्रतिक्रिया नोंदवली होती. यामध्ये जावेद अख्तर, शबाना आजमी, ऋचा चड्डा, स्वरा भास्कर आणि कंगना राणावत अशा अनेक कलाकारांना समावेश आहे. आता बॉलिवूडची क्वीन कंगना राणावतने पुन्हा एकदा तिचे मत मांडलं आहे. ज्यामुळे सध्या हा चर्चेचा विषय ठरला आहे. कंगनाचे असे मत आहे की, ‘कोणत्याही शाळेने कोणत्याही धार्मिक चिन्हाला प्रमोट करू नये.’
कंगना सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती नेहमी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिने या मुद्द्यावर एक जोरदार पोस्ट शेअर केली होती, जी व्हायरल होत आहे. तिच्या स्टोरीमध्ये तिने इराणमधील ‘बुरखा टू बिकिनी’ चा फोटो शेअर करत ‘हिंमत दाखवायची असेल तर अफगाणिस्तानमध्ये बुरखा न घालता फिरून दाखवा’ असे म्हटले होते.
तर कंगनाच्या या पोस्टवर ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी प्रतित्तर दिले आहे. त्यांनी प्रश्न केला होता की, ‘अफगाणिस्तान आणि भारतामध्ये फरक आहे हे कंगनाला माहीत नाही का?’ एवढ्यावर हे प्रकरण थांबले नसून नंतर कंगनाने यावर आणखी प्रतिक्रिया दिली आहे.
याबाबत कंगना म्हणाली की, ‘शिक्षणासाठी हिजाबपेक्षा पुस्तक महत्त्वाची आहेत. शाळेत जय माता दीचा दुपट्टा किंवा बुरखा यापैकी काहीही घालू शकत नाही. आपल्या गणवेशाचा आदर केला पाहिजे. शाळांमध्ये कोणत्याही धार्मिक चिन्हाचा किंवा वस्तूचा प्रचार करू नये.’
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणाली होती की, “भारत आणि अफगाणिस्तानमध्ये फरक आहे. पण भारत हा एक लोकशाही देश आहे. मात्र ७०-८० वर्षांपूर्वी भारतात लोकशाही नव्हती. मग ७० वर्षांनंतरही भारतात लोकशाही राहील याची हमी नाही. त्याचे संरक्षण करावे लागेल, आवाज उठवावा लागेल.”
कंगना पुढे म्हणाली की, “ येत्या काही दिवसांत निवडणुक होणार असल्यामुळे हे सर्व नाटक सुरु आहे. सध्या काश्मीरमधील एक टॉपर मुलगी आहे. त्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. सध्या तिचे जीवन नरक बनले आहे. तर काही तू बुरखा का घालत नाहीस असं म्हणतं लोक तिचा पाटलाग करत होते.”
तसेच कंगना पुढे म्हणाली की, “खरंतर शाळेत जाणार्या बहुतेक मुलींची ही सोय अही तर निवड आहे. मुलींना बुरखा घातला नाही तर त्यांच्यावर बलात्कार होतो असं सांगितल्यामुळे त्यांच्या अभ्यासावर परिणाम होतं आहे. अशा गोष्टी करून तुम्ही फक्त मुस्लिम मुलींच नाही तर हिंदू मुलींचं आणि सगळ्यांचं आयुष्य उध्वस्त करत आहात.”
कंगना म्हणाली की, “पुस्तक हिजाबच्या उच्च स्थानी आहे. शाळेचा एक गणवेश असतो आणि प्रत्येकाने त्याचा आदर केला पाहिजे. मुलांचे शिक्षण अधिक महत्त्वाचे आहे. तुम्ही शाळेत गेलात की, तिथे तुम्हाला गणवेश दिला जातो. गणवेश हा एक कोड असतो. शाळेत सर्व धर्म समभाव सांगितला जातो.
शाळेचा गणवेश सगळ्यांसाठी सारखाच असतो. शाळेत कोणत्याही धार्मिक चिन्हाचा किंवा वस्तूचा प्रचार करू नये. गणवेश दिला की गरीब-श्रीमंत, हिंदू-मुस्लिम भेद न राहता सर्वजण एकत्र येतात.” अशा पद्धतीने कंगना ने तिची प्रतिक्रिया मांडली.