बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना राणावत सध्या तिच्या एका नव्या शोमुळे (Kangana Ranaut Lock Upp Show) फारच चर्चेत आहे. लवकरच कंगना एका शोद्वारे डिजिटल डेब्यू करताना दिसणार आहे. मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा जलवा दाखवल्यानंतर आता कंगना ओटीटी प्लॅटफॉर्मवर धमाका करण्यास सज्ज झाली आहे. ‘लॉकअप’ असे या शोचे नाव असून कंगना हा शो होस्ट करताना दिसून येणार आहे.
नुकतीच या शोचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर हा ट्रेलर शेअर केला आहे. ट्रेलरमध्ये दिसत आहे की, ‘कंगना सुरुवातीला म्हणते की, एक अशी जागा जिथे राहणे एखाद्या स्वप्नापेक्षा काही कमी नाही, ते आहे लॉकअप. इथे सेलिब्रिटींच्या हायक्लास गरजांची पूर्ण काळजी घेतली जाणार नाही. पण या सेलिब्रिटींना त्रास देण्याबाबत विचार नक्कीच करण्यात येणार. त्यामुळे हातकड्यांसोबत त्यांना अशा स्पर्धकांची सोबत मिळणार, ज्यांच्यासोबत त्यांचे अजिबातच पटत नाही’.
व्हिडिओत पुढे कंगना म्हणते की, ‘देशातील सर्वात वादग्रस्त सेलिब्रिटींवर जेलमध्ये २४ तास नजर ठेवण्यासाठी येत आहे ‘लॉकअप’ २७ फेब्रुवारीपासून. या जेलमध्ये सेलिब्रिटीज तेच करणार जे मी सांगणार’. दरम्यान, ट्रेलर पाहून असे वाटत आहे की, यामध्ये सहभागी होणाऱ्या सेलिब्रिटींसाठी हा शो खूपच त्रासदायक असणार आहे.
या शोमध्ये एकूण १६ सेलिब्रिटीज सहभागी होणार आहेत. या सेलिब्रिटींना ७२ दिवसांसाठी लॉकअपमध्ये ठेवण्यात येणार आहे. या काळात या सेलिब्रिटींना कोणत्याही सुखसुविधा देण्यात येणार नाही. तसेच त्यांना अशा व्यक्तीसोबत ठेवण्यात येणार जे एक क्षणसुद्धा त्यांच्यासोबत राहू शकणार नाहीत. याशिवाय जर शोमध्ये त्यांना टिकून राहायचे असेल तर त्यांना त्यांचे सीक्रेट्स सांगावे लागणार.
रिपोर्टनुसार, शोमध्ये श्वेता तिवारी, शहनाज गिल, कुशाल टंडन, चेतन भगत यासारे कलाकार दिसू शकतात. एकता कपूरद्वारा निर्मित हा शो २७ फेब्रुवारीपासून एमएक्स प्लेयर आणि अल्ट बालाजी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम करण्यात येणार आहे. त्यामुळे कंगनाचा हा शो प्रेक्षकांच्या किती पचनी पडेल, हे येणाऱ्या काळात कळेलच.
दरम्यान, कंगनाचा हा शो ‘बिग बॉस’ पेक्षा वेगळा आहे. बिग बॉस शोमध्ये सर्व स्पर्धकांच्या गरजांची काळजी घेण्यात येते. पण लॉकअप शोमध्ये स्पर्धकांना कोणत्याही सुविधा मिळणार नाहीत. तसेच बिग बॉस शोमध्ये सर्व स्पर्धकांना बिग बॉसचे नियम मान्य करावे लागते. तर दुसरीकडे लॉकअप शोमध्ये कंगनाच बिग बॉस आहे. म्हणजे इथे सर्वांना तिचेच नियम फॉलो करावे लागणार.
महत्त्वाच्या बातम्या :
नथुराम गोडसेला हिरो म्हणणाऱ्या विद्यार्थ्याला वकृत्व स्पर्धेत मिळाले पहिले बक्षीस; जाणून घ्या नक्की घडलं
हिजाब वादाला द्रौपदीच्या वस्त्रहरणाशी जोडणाऱ्या स्वरा भास्करवर नेटकरी संतापले, म्हणाले..
VIDEO: अजय देवगनचा राग पाहून घाबरले आनंद महिंद्रा, ट्विटमध्ये खुलासा करत म्हणाले..