कंगना राणौतची (Kangana Ranaut) नेहमी तक्रार असायची की, बॉलिवूड स्टार्स तिची स्तुती करायला घाबरतात. आता सलमान खानने (Salman Khan) तिची ही तक्रार दूर केली आहे. सलमान खानने कंगना राणौतच्या ‘धाकड’ चित्रपटाचा दुसरा ट्रेलर शेअर केला असून कंगना राणौतला टॅग करत ‘धाकड’च्या (Dhaakad) संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे.(Kangana Ranaut got Salman’s support)
कंगना राणौतचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘धाकड’ चा दुसरा ट्रेलर आज गुरुवारी रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये कंगनाचे जबरदस्त अॅक्शन सीक्वेन्स आहेत आणि चाहते आधीच म्हणत आहेत की या चित्रपटाची झलक हॉलीवूडच्या चित्रपटांशी जुळणारी दिसते. कंगनाच्या चित्रपटाचे चाहते कौतुक करत करताना थकत नाही. त्याचवेळी बॉलिवूडच्या दबंग खाननेही तिचा चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे.
कंगनाच्या ‘धाकड’चा ट्रेलर शेअर करताना सलमानने लिहिले, ‘टीम धाकडचे खूप खूप अभिनंदन.’ या पोस्टमध्ये सलमानने कंगना राणौत, अर्जुन रामपाल आणि निर्माता सोहेल मकलाई यांना टॅग केले आहे. सलमानच्या या पोस्टवर अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे, तर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. एकाने लिहिले आहे, अरे व्वा, सलमान सर काय केले. माझे मन आनंदित केले. आणखी एकाने लिहिले आहे, भाऊ तुझे इंस्टाग्राम डिलीट करण्याची वेळ आली आहे.
सलमान खानच्या या पोस्टनंतर कंगना रणौतनेही सोशल मीडियावर पोस्ट करून त्याचे आभार मानले आहेत. कंगनाने इंस्टा स्टोरीवर लिहिले आहे ‘धन्यवाद माझ्या दबंग हिरो, ज्याचे हृदय सोन्यासारखे आहे. आता मी या इंडस्ट्रीत एकटी आहे असे कधीच म्हणणार नाही. संपूर्ण धाकड टीमच्या वतीने धन्यवाद.’ यासोबतच तिने सलमानच्या पोस्टचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे.
Has arrived!!
Raising the standard of action 👏..
Why should men have all the fun🎉#kangana #dhaakad pic.twitter.com/TaFKzD5378— Vidyut Jammwal (@VidyutJammwal) May 12, 2022
सलमान खान व्यतिरिक्त विद्युत जामवालने देखील कंगनाच्या या चित्रपटाच्या ट्रेलरचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून अभिनेत्रीचे कौतुक केले आहे. अभिनेत्याने लिहिले आहे ‘आल आहे, ऐक्शनच्या स्टैंडर्डला वरती उचलणार कोणीतरी आलं आहे. यासोबतच त्यांनी लिहिलं आहे, Why should men have all the fun. कंगनाने या पोस्टचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, कंगनाने अलीकडेच आरजे सिद्धार्थ कननसोबतच्या संभाषणात सांगितले होते की, चित्रपटसृष्टीतील बरेच लोक तिची प्रशंसा करण्यास कचरतात. ती म्हणाली होती, ‘मी एका बॉलिवूड पार्टीला (सलमान खानची बहीण अर्पिताची ईद पार्टी) गेले होते. पार्टीतील प्रत्येकजण ट्रेलरबद्दल बोलत होते. जर तुम्ही ट्रेलर पाहून इतके प्रभावित आहात तर तुम्ही गप्प का? (सोशल मीडियावर मौन का आहे). मात्र, आता कंगनाने इंडस्ट्रीत एकटी राहण्याची तक्रार करणार नसल्याचे सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
थॅंक्स सलमान, आता मला कधीच एकटं वाटणार नाही कंगना असं का म्हणाली? हे आहे कारण
कंगना आता थेट बॉलिवूडवरच बरसली; म्हणाली, ईद पार्टीत सगळ्यांनी धाकडचे कौतुक केले पण..
आपल्या वेदांची कॉपी आहे एवेंजर्स, कंगना राणावतने हॉलिवूडच्या सुपरहिरोंवर उपस्थित केले प्रश्न
हनुमानजींचा कॉपी आहे थॉर तर कर्णचा कॉपी आहे आर्यनमॅन कंगनाने मांडली विचित्र थेअरी