Share

कंगनाने तोडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा; पहा व्हायरल व्हिडिओ

Kangana Ranaut

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) लवकरच ‘धाकड’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतीच काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. यामध्ये कंगनाचा जबरदस्त अॅक्शन अंदाज दिसून आला होता. त्यानंतर आता चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात येणार आहे. She’s On Fire असे या गाण्याचे नाव असून यामध्ये कंगना खूपच बोल्ड अंदाजात दिसून येत आहे.

कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर ‘She’s On Fire’ या गाण्याचा टीझर शेअर केला आहे. हा टीझर सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या गाण्यात कंगनाचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. तर टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षक संपूर्ण गाणं पाहण्यासाठी उत्सुक आहेत. तर आज हे गाणं रिलीज करण्यात येणार आहे.

हा टीझर व्हिडिओ शेअर करत कंगनाने लिहिले की, ‘आग इतकी भीषण की फायर बिग्रेडसुद्धा त्याला विझवू शकत नाही’. कंगनाच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिच्या लूकचे कौतुक करत आहेत. दरम्यान, ‘She’s On Fire’ या गाण्याला गायक बादशाह यांनी आवाज दिला आहे. तर कंगनासोबत या गाण्यात अभिनेता अर्जून रामपालसुद्धा दिसणार आहे.

‘धाकड’ हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. यामध्ये कंगनाचा अॅक्शन अवतार पाहायला मिळणार आहे. रजनीश घई यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. कंगनासोबत अर्जून रामपाल आणि दिव्या दत्ता या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. २४ मे रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, कंगनाचा २०२१ साली आलेल्या ‘थलायवी’ या चित्रपटानंतर आता ‘धाकड’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. तसेच कंगना सध्या ‘लॉकअप’ हा रिअॅलिटी शो होस्ट करत आहे. लवकरच ती ‘तेजस’ आणि ‘टीकू वेड्स शेरू’ या चित्रपटांद्वारेही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नुकतीच सलमान खानची बहिण अर्पिता खानने ईदच्या पार्टी आयोजित केली होती. दिसली होती. या पार्टीत कंगनासुद्धा सहभागी झाली होती. यादरम्यानचे तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. कंगनला ईदच्या पार्टीत पाहून अनेकांना आश्चर्य वाटले होते.

कंगनाचे हे व्हिडिओ समोर आल्यानंतर तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलही करण्यात आले. खान मंडळींना शिव्या देते आणि त्यांच्याच ईद पार्टीला जाते, असे म्हणत अनेकांनी तिच्यावर सडकून टीका केली होती.

महत्त्वाच्या बातम्या :
हिंदीच्या वादानंतर ‘या’ ७ लोकांनी अजय देवगणला दिले भारताच्या विविधतेचे धडे, वाचून तुम्हीही कराल कौतुक
VIDEO: सलमानच्या ईद पार्टीत दिसली कंगना; नेटकरी संतापले, ‘सरड्याचा रंग बदलत आहे’
आर माधवनच्या मुलाने यशाचे श्रेय दिले आई-वडिलांना; म्हणाला, त्यांनी माझ्यासाठी अनेक त्याग केले आहेत

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now