एस. एस. राजमौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ (RRR) हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असून बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. आरआरआर पाहून अनेकजण चित्रपटाचे आणि दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांचे कौतुक करत आहेत. यादरम्यान बॉलिवूडची क्वीन कंगना राणावतनेसुद्धा आरआरआर पाहून चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे.
कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती ‘आरआरआर’ (RRR) चित्रपटाचे कौतुक करताना दिसून येत आहे. व्हिडिओत कंगना म्हणत आहे की, ‘मी माझ्या कुटुंबीयांसोबत ‘आरआरआर’ चित्रपट पाहिला. तसे पाहता या चित्रपटाला कोणत्याही प्रचाराची गरज नाही. हा चित्रपट सर्व रेकॉर्ड तोडत आहे अनेक नवीन रेकॉर्ड बनवत आहे. पण देशभक्तीच्या भावनेने भरलेला हा चित्रपट देशाची संस्कृती, अस्मिता, गरिमा, एकता, चांगली कलाकृती आणि संस्कृतीला प्रोत्साहन देणारा हा चित्रपट कोणताही खरा भारतीय पाहणार तेव्हा त्याला हेच वाटणार की, या चित्रपटाचे कौतुक करावे’.
कंगना पुढे म्हणाली की, ‘आरआरआर’ (RRR) चित्रपटात दाखवण्यात आलेल्या कोमरम भीम आणि रामराजू या क्रांतिकारकांची कथा पाहून असे वाटते की, असे कितीतरी हिरो होऊन गेले असतील जे आपल्याला माहित नाहीत. तसेच चित्रपटाचे लेखक के. वी विजयेंद्र प्रसाद यांनी आतापर्यंत सर्व यशस्वी चित्रपट दिले आहेत. ८० वर्षांच्या वयातही ते सर्वात व्यग्र लेखक आहेत. त्यांचा आदर्श सर्वांनी घेण्यासारखा आहे’.
‘तसेच चित्रपटात एनटीआर, रामचरण तसेच इतर सर्व कलाकारांनी खूप चांगलं काम केलं आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक राजमौली यांच्याबाबत तर काय सांगायचं. त्यांच्या दिग्दर्शनाबाबत बोलायचे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखे आहे. ते राजा आहेत म्हणजेच किंग आहेत. मी एवढंच म्हणेन की, राजाला दीर्घायुष्य लाभो’.
दरम्यान, ‘आरआरआर’ (RRR) हा चित्रपट २५ मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटात राम चरण, ज्यूनियर एनटीआर, आलिया भट्ट आणि अजय देवगन मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट कोमरम भीम आणि अल्लूरी रामराजू या दोन क्रांतिकारकांवर आधारित आहे. या दोन क्रांतिकारकांनी ब्रिटीश राजवट आणि हैदराबाद निजामविरोधात लढा दिला होता.
ज्यूनियर एनटीआर या चित्रपटात कोमरम भीम यांच्या भूमिकेत तर रामचरण अल्लूरी सीतारामराजू यांच्या भूमिकेत आहे. अभिनेत्री आलिया भट्ट या चित्रपटात अल्लूरी रामराजू यांच्या पत्नी अल्लूरी सीता रामराजू यांची भूमिका साकारत आहे. तेलुगूसह हा चित्रपट तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषेतही प्रदर्शित झाला आहे. डीवीवी एंटरटेनमेंट्सद्वारा चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
विकी-कतरिना सीक्रेट लोकेशनवर करत आहेत एन्जॉय, रोमॅंटिक फोटो झाले व्हायरल, चाहते म्हणाले..
‘या’ चित्रपटात आमिरसोबत झळकणार जेनेलिया देशमुख, अनेक वर्षांनंतर चालणार क्युटनेसचा जादू
जवळच्या व्यक्तीच्या निधनाने मिथिला पालकरवर कोसळला दुःखाचा डोंगर, म्हणाली, ‘ते माझ्यासाठी खास होते’