Share

VIDEO: सलमानच्या ईद पार्टीत दिसली कंगना; नेटकरी संतापले, ‘सरड्याचा रंग बदलत आहे’

सलमान खानच्या (Salman Khan) ईद पार्टीची झलक समोर येत आहे, ज्यामध्ये ‘लॉक अप’ (Lock Upp) होस्ट कंगना रनौतने (Kangana Ranaut) देखील हजेरी लावली होती. यावेळी सलमान खानची ईद पार्टी त्याची बहीण अर्पिता खान (Arpita khan) आणि पती आयुष शर्मा (Aayush Sharma) यांनी होस्ट केली आहे. बॉलिवूडच्या अशा पार्ट्यांपासून अनेकदा दूर राहणाऱ्या कंगनाला पाहून अनेक यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत.(kangana-appeared-at-salmans-eid-party)

कंगनाचा हा व्हिडिओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. सलमान खानची बहीण अर्पिताच्या ईद पार्टीला कंगना अगदी पारंपरिक स्टाईलमध्ये पोहोचली. अर्पिताच्या घराबाहेरील कॅमेऱ्यात कंगना कमालीची कैद झाली. यादरम्यान कंगनाने सर्वांना ईद मुबारक म्हटले. या व्हिडिओवर चाहते वेगवेगळ्या कमेंट करताना दिसत आहेत.

या पार्टीत कंगना कशी पोहोचली याचे चाहत्यांना आश्चर्य वाटत आहे. एकाने विचारले की तिला आत कोण जाऊ देणार? एकाने लिहिले या पार्टीत कशी आली, देशभक्तीच्या नावाखाली मुस्लिमांविरुद्ध इतका द्वेष पसरवत असते. काहींनी लिहिले आहे गिरगिटाचा रंग बदलत आहे. दुसर्‍या यूजरने लिहिले, शेवटी आमंत्रण मिळाले?

Kangana Ranaut at Salman khan eid party

काही लोकांनी तर कंगनाला सलमान खानसोबत चित्रपटात पाहण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. काहींनी असा सवालही केला आहे की, जर तुम्ही मुस्लिमांचा द्वेष करत असाल तर मग ईदच्या पार्टीला कसे पोहोचलात. अशाप्रकारे अनेकांनी कंगनाच्या पार्टीला येण्यावर प्रश्न उपस्थितीत केला आहे. काहींना तिचं या पार्टीला उपस्थितीत राहण आवडलं नाही तर काहींनी वेगळेच तर्क लावले आहे.

कंगना नेहमीच बॉलिवूडमधील बड्या स्टार्सना टार्गेट करत त्यांना मूव्ही माफियाच्या श्रेणीत आणते. कधी कोणाच्या आवडत्या तर कधी चित्रपट माफियाच्या भीतीने कंगना स्टार्सच्या गुप्त कॉलवर बोलत असते. एक व्हिडिओ शेअर करून कंगनाने सांगितले की, चित्रपट माफियाने केवळ तिला  बैनच नाही केले तर तिचे मनही तोडले आहे.

महत्वाच्या बातम्या-
संस्कृत आपली राष्ट्रीय भाषा असली पाहिजे कारण.., हिंदी भाषेच्या वादात आता कंगनाची उडी
मुलाशी जवळीक साधण्यासाठी त्याचे अंडरवेअर तर.., कंगनाच्या शोमध्ये स्पर्धकांनी ओलांडल्या सर्व मर्यादा
कंगनाचे लहानपणी झाले होते लैंगिक शोषण; स्वत:च खुलासा करत म्हणाली, एक मुलगा मला वाईट पद्धतीने..
एजंट अग्नीच्या रुपात बॉक्स ऑफिसवर आग लावायला येत आहे कंगना, पहा धाकडचा टीझर

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now