इंडियन प्रीमियर लीग २०२२ (IPL २०२२) मध्ये उमरान मलिकच्या (Umran Malik) वेगवान गोलंदाजीने बरीच चर्चा केली आहे. उमरानने स्पर्धेतील अनेक जागतिक दर्जाच्या वेगवान गोलंदाजांना मागे टाकून प्रत्येक सामन्यात १५० किमी/ताशी सर्वोच्च वेग राखला आहे. उमरानच्या गोलंदाजीवर क्रिकेट तज्ज्ञ आणि दिग्गजांनाही चांगलीच भुरळ पडली आहे. त्यामुळे त्याला भारतीय संघात संधी देण्याची वकिलीही सुरू आहे.( Kamran Akmal’s big statement about Umran Malik)
दरम्यान, पाकिस्तानी क्रिकेटपटू कामरान अकमल देखील मलिकच्या आयपीएल २०२२ मधील कामगिरीने प्रभावित झाला आहे. कामरान म्हणाला की मलिक पाकिस्तानमध्ये असता तर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले असते. कामरानच्या या स्टेटमेंटने सर्वांनाच चकित केले आहे. तसेच पुढील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उमरान मलिकचा समावेश असणार का याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
कामरान म्हणाला की, तो पाकिस्तानात असता तर कदाचित तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला असता. त्याची इकॉनमी उच्च आहे, तसेच तो स्ट्राइक गोलंदाज आहे कारण त्याला विकेट मिळत आहेत. प्रत्येक सामन्यानंतर त्याचा स्पीड चार्ट येतो, जिथे तो सुमारे १५५ किमी/ताशी असतो, त्यात तो कमी होत नाही. भारतीय संघात हा चांगला खेळाडू आहे.
पूर्वी भारतीय क्रिकेटमध्ये दर्जेदार वेगवान गोलंदाजांची कमतरता होती, पण आता त्यांच्याकडे नवदीप सैनी, (मोहम्मद) सिराज, (मोहम्मद) शमी आणि (जसप्रीत) बुमराहसारखे वेगवान गोलंदाज आहेत. गेल्या हंगामात तो फक्त एक किंवा दोन सामने खेळला होता. तो पाकिस्तानात असता तर नक्कीच आमच्यासाठी खेळला असता. पण मलिकला आयपीएलच्या संपूर्ण हंगामात खेळण्याची संधी देऊन भारतीय क्रिकेटने बरीच परिपक्वता दाखवली.
सनरायझर्स हैदराबाद (SRH) युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने आयपीएल २०२२ मध्ये आपल्या वेगवान खेळीने सर्वांनाच उत्साहित केले आहे. त्याने गुजरात टायटन्सविरुद्धच्या पाच विकेटसह पहिल्या ८ सामन्यांत १५० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली आहे. पण गेल्या तीन सामन्यांत त्याला एकही विकेट न मिळाल्याने जम्मूच्या या युवा वेगवान गोलंदाजाचा भारतीय संघात समावेश करायचा का, असा सवाल समीक्षकांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
उमरान मलिकच्या रुपात नगीना भेटला आहे, सांभाळून ठेवावा लागेल नाहीतर मुनाफ पटेलसारखी अवस्था होईल
इरफान पठानने घडवला उमरान मलिकपेक्षा खतरनाक गोलंदाज, पोलिसाची नोकरी सोडून बनला क्रिकेटर
उमरान आणि बुमराह मिळून इंग्रजांची बॅंड वाजवतील, काश्मिरी मुलाने जिंकले शशी थरूर यांचे मन
IPL २०२२ नंतर ‘हे’ २ नवोदीत गोलंदाज थेट भारतीय संघात स्थान मिळवतील; रवी शास्त्रींनी थेटच सांगीतलं