Share

सलमानवर सतत टीका करणाऱ्या अभिनेत्याचे सपशेल लोटांगन; म्हणाला तो माझा शत्रू नाही, तो तर..

स्वतःला चित्रपट समीक्षक म्हणून सांगणारा कमाल आर खान नेहमी काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो. विशेषतः सलमानसोबत नेहमीच त्याचे वाद होत असते. तसेच सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर करत तो सलमान खानवर निशाणा साधत असतो. मात्र, त्याचा प्रत्येक पोस्ट सलमानसंदर्भात नसतो आणि सलमान खान हा त्याचा मोठा भाऊ असल्याचे कमाल खानने म्हटले आहे.

कमाल खानने त्याच्या ट्विटर हँडलवर एक ट्विट करत लिहिले की, ‘मी माध्यमांना विनंती करत आहे की, माझा प्रत्येक ट्विट सलमान खानसोबत जोडू नका. आमच्यामध्ये काही गैरसमजूती आहेत. पण तो माझा मोठा भाऊ आहे. मी त्याचा शत्रू नाही आणि मी त्याचा द्वेषही करत नाही. माझा प्रत्येक ट्विट त्याच्यासाठी नसतो. इंडस्ट्रीत इतरही अनेक अभिनेते आहेत. त्यांच्यासंदर्भातही मी ट्विट करत असतो’.

https://twitter.com/kamaalrkhan/status/1482664400100200455?s=20

यापूर्वी कमाल खानने सिक्स पॅक अॅब्जचा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्ध्ये त्याने सलमान खानचा नाव न घेता त्याच्यावर निशाणा साधला होता. व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिले होते की, ‘तुम्ही मला सांगू शकता का ? की, बॉलिवूडमध्ये हे नकली सिक्स पॅक अॅब्जचा वापर कोण करतात?’

https://twitter.com/kamaalrkhan/status/1481556329655328768?s=20

कमाल खानच्या या व्हिडिओवर अनेक नेटकरी कमेंट करत सलमान खानचे नाव लिहिले होते. तसेच कमाल खानचा इशारा सलमान खानकडेच होता, याचा अंदाजही नेटकऱ्यांनी आला होता.

दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी सलमान खानने कमाल खानवर मानहानीचा खटला दाखल करत त्याला कायदेशीर नोटिस पाठवण्यात आली होती. त्यानंतर कमाल खानने म्हटले होते की, त्याने राधे चित्रपटाचा नकारात्मक समीक्षण केल्याने त्याच्यावर खटला दाखल करण्यात आला.

दुसरीकडे सलमान खानच्या कायदेशीर टीमद्वारे एक निदेवन जारी करत सांगण्यात आले की, कमाल आर खानद्वारे सांगण्यात येणारे कारण चुकीचे आहे. सलमान खान हा भ्रष्ट आहे, तो आणि त्याची संस्था बीईंग ह्युमन फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गुंतलेली आहे, अशाप्रकारचे बदनामीकारक आरोपांना समर्थन देत ते प्रकाशित करत असल्याने कमाल खानवर खटला दाखल करण्यात आल्याचे टीमद्वारे सांगण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या : 

लता मंगेशकर यांची तब्येत आणखी बिघडली, डॉक्टरांनी दिली धक्कादायक माहिती

मानेंना मोठं व्हायचय म्हणून वाद ते निर्माण करताहेत; शिवसेनेचे किरण मानेंवर गंभीर आरोप
‘या’ धक्कादायक कारणामुळे किरण मानेंना मालिकेतून काढले; वाहिनीने सांगितले वेगळेच सत्य

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now