Share

kalyani jadhav : ‘तुझ्यात जीव रंगला’फेम अभिनेत्रीला डंपरने उडवले; भयानक अपघातात झाला मृत्यू

kalyani jadhav

kalyani jadhav car accident death | गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघाताचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. काही लोकांना या अपघातात आपला जीवही गमवावा लागतो. अशात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तुझ्यात जीव रंगला मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा भीषण अपघात झाला आहे.

तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री कल्याण कुरळे जाधव हिचा कोल्हापूर सांगली महामार्गावर अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की तिचा त्या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. कल्याणी जाधव ही प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिने अनेक मालिकांमधून महाराष्ट्रातील घराघरात आपली ओळख निर्माण केली होती.

कल्याणीला खरी ओळख तुझ्यात जीव रंगला या मालिकेतूनच मिळाली होती. तिने काही दिवसांपूर्वीच प्रेम भाकरी नावाचे हॉटेल सुरु केले होते. त्या हॉटेलमधून बाहेर पडत असतानाच एका डंपरने तिला धडक दिली आहे. हा अपघात इतका भीषण होता की तिचा त्यामध्ये जागीच मृत्यू झाला आहे.

कल्याणीच्या जाण्याने संपुर्ण मनोरंजनविश्वात शोककळा पसरली आहे. कल्याणीच्या मृत्यूवर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. सर्वांना हे अफवा असल्याचेही वाटत होते. ती मध्यरात्री कोल्हापूर सांगली रस्त्यावरील हालोंडी फाटा येथे उभी होती. त्यावेळी तिला डंपरने धडक दिली आहे.

कल्याणीने तुझ्यात जीव रंगला, जीव माझा गुंतला यासह अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने प्रेमाची भाकरी नावाचे हॉटेल उघडले होते. ते हॉटेल बंद करुन घरी परतत असतानाच तिचा मृत्यू झाला आहे. कल्याणी जाधवचा असा अचानक मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

दरम्यान, कोल्हापूर सांगली महामार्गावरील रस्ते अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या मार्गामध्ये अनेक खड्डे आहे. त्यामुळे हा मार्ग खुपच धोकादायक आहे. त्यामुळे अनेक अपघात या ठिकाणी झाले आहे. अनेकांचा जीवही गेल्यामुळे संघटनांनी रस्त्यासाठी आंदोलने केली आहे.

महत्वाच्या बातम्या-
कुत्रा चावला तर मालकालाच बसणार भूर्दंड, भरावा लागणार १० हजार रुपये दंड; काय लाड करायचे ते आपल्या घरी
प्रियकराने फेसबुक लाईव्हवर ग्राइंडर मशीनने कापला स्वत:चा गळा; प्रेयसीमुळे उचललं भयानक पाऊल
mumbai indians : मुंबई इंडियन्सचा धक्कादायक निर्णय, स्टार खेळाडूची संघातून हकालपट्टी; ‘या’ ७ खेळाडूंना ठेवलं कायम

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now