Share

कल्याण हादरलं! १० ते १२ जणांची टोळी अक्षरशः तुटून पडली, १७ वर्षीय मुलाचा घेतला जागीच जीव…

कल्याणमधून सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. याठिकाणी सध्या एका १७ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली. खडेगोळवली परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. १० ते १२ जणांच्या टोळक्याने या मुलाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुलाचा मृत्यू झाला.

समीर लोखंडे (वय १७) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत कोळसेवाडी पोलिसांनी कारवाई करत काही संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. क्षुल्लक कारणावरून टोळक्याने या मुलाचा जीव घेतला, असे सांगितले जात आहे.

याबाबत हत्या करणाऱ्या काही संशयित आरोपींना कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली आहे. याठिकाणी दोन दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली होती.

यामुळे कल्याण आणि परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कल्याणमध्ये भररस्त्यात एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला होता. तरुणावर कोयत्याने हल्ल्याची घटनाही घडली होती. 

मागच्या काही दिवसांपासून पोलिसांनी गस्त वाढवली. उपाययोजना सुरू केल्या आहेत. तरीही गुन्हेगारी थांबताना दिसत नाही. यामुळे याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे. यामुळे परिसरात भीती निर्माण झाली आहे.

दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. टोळीयुद्ध, खंडनी, मुलींवर हल्ले केले जात आहेत. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. याठिकाणी पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे दिसून येत आहे.

क्राईम

Join WhatsApp

Join Now