Share

कालिन भैया की बाबा निराला, कोण आहे ओटीटीचा बादशाह? कोण घेतं सगळ्यात जास्त मानधन?

कोरोनाकाळापासून ओटीटीला चांगले दिवस आले आहेत. लोक नवीन सिनेमा बघायला, चित्रपटगृहात न जाता मनोरंजनाचा पर्याय म्हणून ओटीटीला पसंती दर्शवत आहेत. या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक अभिनेते काम करतात. पण प्रेक्षकांच्या मनावर कोण राज्य करत आहे? कोण सर्वाधिक कमाई करतो. चला बघुयात.. (saif ali khan, pankaj tripathi, boby deol, manoj bajpeyee, jitendra kumar)

सैफ अली खान

 

सैफ अली लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने अनेक वर्षांपूर्वी ओटीटीवर पदार्पण केले होते. सेक्रेड गेम्स तसेच तांडवमध्येही तो दिसला होता. सैफ बॉलीवूडचा लोकप्रिय स्टार असल्याने तो ओटीटीवरील एका मालिकेसाठी करोडो रुपये घेतो. अधिक माहितीनुसार, त्याने आतापर्यंत आलेल्या वेब सीरिजमध्ये 15 कोटी रुपये घेतले होते.

पंकज त्रिपाठी
बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी त्याच्या उठावदार अभिनयासाठी ओळखला जातो. त्याने अनेक सीरिजमध्ये काम केले आहे. मिर्झापूरमधील त्याची भूमिका प्रेक्षकांच्या सर्वाधिक पसंतीस उतरली. मिर्झापूरचे दोन सीझन आले होते. आता तिसरा सीझन लवकरच प्रदर्शित होणार आहे. अधिक माहितीनुसार, पंकज त्रिपाठीने मिर्झापूर 2 साठी 12 कोटी रुपये चार्ज केले होते.

बॉबी देओल
आश्रम वेब साकारणारा सिरीजमधून बाबा निरालाची भूमिका साकारणारा बॉबी देओल सध्या खुपच चर्चेत आहेत. कारण आश्रमचा तिसरा सीझन येतोय. अधिक माहितीनुसार, या सिरीजसाठी बॉबी देओलला 2 कोटी रुपये मिळाले आहेत.

मनोज बाजपेयी
‘द फॅमिली मॅन’ ही सुपरहिट मालिका देणारा मनोज बाजपेयी हा हिंदी चित्रपटसृष्टीचा मोठा चेहरा आहे. अधिक माहितीनुसार, मनोज बाजपेयीने द फॅमिली मॅन 2 साठी 10 कोटी रुपये घेतले होते. आता लवकरच मनोज द फॅमिली मॅन 3 मधून ओटीटीवर परतणार आहे.

अली फजल
कालिन भैया व्यतिरिक्त मिर्झापूरचे आणखी एक पात्र खूप मनोरंजक होते. तो म्हणजे गुड्डू भैया, अली फजलने ही भूमिका साकारली होती. अली फजलने ही भूमिका साकारण्यासाठी प्रत्येक एपिसोडसाठी 12 लाख रुपये आकारले.

जितेंद्र कुमार
पंचायत वेब सिरीजमुळे प्रसिद्ध झालेला जितेंद्र कुमार आता त्याच्या दुसऱ्या सीझनमुळे चर्चेत आहे. त्याने प्रत्येक एपिसोडसाठी 50 हजार रुपये आकारले आहेत. अशा तऱ्हेने हे सर्व कलाकार ओटीटीवर काम करत बक्कळ कमाई करत आहेत. एक एका वेब सिरीजसाठी कोटी रुपयांचे मानधन घेत आहेत.
महत्वाच्या बातम्या
प्राजक्ता गायकवाडला सेटवरच भेटली चिमुकली फॅन, दिले घरी येण्याचे आमंत्रण, प्राजक्ता म्हणाली…
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असूनही आम्हाला पाठबळ मिळत नाही; शिवसेना खासदाराने व्यक्त केली खंत
पु्ष्पा २ ची रिलीज डेट झाली लीक, ‘या’ दिवशी चित्रपगृहांत परतणार पुष्पा, घालणार धुमाकूळ
करणी सेनेच्या तक्रारीनंतर अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’चे बदलले नाव, आता ‘या’ नावाने होणार रिलीज

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now