Share

….अन् मराठीतून बोलायचं म्हणून घाबरली काजोल, थेट मंचावर आईला मारली मिठी; वाचा नेमकं काय घडलं

kajol
आपल्या अभिनय कौशल्याने एकेकाळी बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून काजोलला ओळखले जाते. जगभरात तिचे लाखो चाहते आहेत. अगदी वयाच्या १६ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हळूहळू तिला यश मिळत गेले. अखेर आज काजोल यशाच्या शिखरावर पोहचली आहे.

तिने अनेक चित्रपटांमध्ये काम करत स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. कलाविश्वाप्रमाणेच काजोल सोशल मीडियावरही सक्रीय असते.  काजोल आपले स्टेटमेंट्स आणि हटके स्टाईल्समुळे नेहमीच चर्चेत असते. आता मराठीत देखील आपला अंदाज दाखवण्यास तयार झाली आहे.

वाचून तुम्हाला थोड नवल वाटेल मात्र हे खरं आहे. काजोल पहिल्यांदा मराठी टेलिव्हिजनवर दिसणार आहे. ‘कोण होणार करोडपती’चे सहावे पर्व सोमवारी ६ जूनपासून सुरू झाले आहे. इतर पर्वांप्रमाणेच या ही सीझनमध्ये विविध मान्यवरांची उपस्थिती प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

या खास कार्यक्रमाच्या पहिल्याच आठवड्यात विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा आणि अभिनेत्री काजोल ही मायलेकींची गोड जोडी उपस्थित राहणार आहे. या दोघी जणी ‘एबल डिसेबल ऑल पीपल टुगेदर’ या संस्थेसाठी ‘कोण होणार करोडपती’ हा खेळ खेळणार आहेत.

विशेष बाब म्हणजे, ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर पहिल्यांदाच या दोघींमधला अनोखा बंध पाहायला मिळणार आहे. तुम्हाला हा एपिसोड ११ जून रोजी म्हणजेच शनिवारी पाहता येणार आहे. सोनी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरुन याविषयी पोस्ट करण्यात आली आहे.

दरम्यान, या व्हिडिओमध्ये सचिन खेडेकर म्हणतात की भरपूर प्रश्न मराठीमधूनच विचारणार आहेत. यावेळी उत्तर देताना काजोल म्हणते की, ‘मी अजिबात नरव्हस नाही आहे’. पण अखेरीस ती मोठ्याने ‘मम्मी…’ ओरडते आणि तनुजा यांना मिठी मारते. काजोलच्या अशा वागण्यानं मंचावर एकच हशा पिकतो.

दरम्यान, नक्कीच काजोलला सचिन खेडेकर यांचे मराठीतील प्रश्न समजून त्याचं उत्तर देणं काजोलसाठी कठीण ठरणार असल्याच दिसत आहे. तिचे चाहते सध्या या एपिसोडची आतुरतेने वाट पाहत आहेत. सोबतच काजोलच्या लहानपणीच्या किश्शांचा उलगडा या भागात सचिन खेडेकर यांच्याशी संवाद साधताना होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या 
इतर ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now