Share

Kajol: अजय देवगनसोबतच्या नात्याबद्दल काजोलने इतक्या वर्षांनी केला खुलासा, म्हणाली, दोन वेळा…

Kajol, Ajay Devgn, Relationship, Miscarriage/ अभिनेत्री काजोलने (Kajol) नुकतेच पती अजय देवगणसोबतच्या (Ajay Devgn) नात्याबद्दल खुलेपणाने बोलले आहे. अफेअर, लग्न, हनिमून यातून झालेल्या दोन गर्भपाताच्या वेदनाही तिने सांगितल्या आहेत. तिचे जुने दिवस आठवून काजोलने खुलासा केला की, अजय देवगणने तिला कधीच प्रपोज केले नाही आणि सुरुवातीला ती त्याचा तिरस्कार करत होती.

तथापि, हलचल’ चित्रपटाच्या सेटवर दोघांची मैत्री झाली आणि तिने तिच्या प्रियकराबाबत त्याच्याशी चर्चाही केली होती. पुढे दोघांचेही आपापल्या जोडीदाराशी ब्रेकअप झाले आणि दोघांचे रिलेशन गुपचूप सुरू झाले. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आणि त्यांचे नाते घट्ट झाले. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

काजोलने अलीकडेच एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना खुलासा केला की, तिचे वडील अजय देवगणसोबतच्या तिच्या नात्याबद्दल खुश नव्हते. वडिलांना अजयसोबत लग्नाबाबत बोलले तेव्हा ते इतके चिडले की 4 दिवस ते तिच्याशी बोललेही नाही. पण नंतर वेळेनुसार गोष्टी चांगल्या झाल्या आणि दोघांची लग्नाची गाठ बांधली गेली.

संवादादरम्यान काजोलने पती अजय देवगणबद्दल काही खुलासेही केले. तिने सांगितले की, अजय त्यांच्या हनिमूनच्या वेळी आजारी पडला होता. काजोलला जास्त दिवस हनिमूनमध्ये घालवायचे होते आणि तिने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी सुमारे 5 आठवडे घालवले. दरम्यान, अजय आजारी पडला आणि त्यांना हनीमून अर्ध्यावर सोडून घरी परतावे लागले.

यादरम्यान काजोलने तिच्या गर्भपाताबद्दलही सांगितले जे खूप वेदनादायक होते. ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटादरम्यान तिचा पहिला गर्भपात झाल्याचे तिने सांगितले. तिला खूप वेदना होत होत्या आणि त्यामुळे चित्रपटाच्या यशाचा आनंदही घेता आला नाही. नंतर तिचा दुसरा गर्भपातही झाला, त्यामुळे तिला खूप वेदना सहन कराव्या लागल्या.

2 गर्भपातानंतर काजोलने अखेर तिसर्‍यांदा मुलगी न्यासाला जन्म दिला. यानंतर ती मुलगा युगची आईही झाली. काजोलचे दोन्ही मुलांवर खूप प्रेम आहे आणि ती त्यांच्यासाठी काहीही करायला तयार आहे. काजोलने 1992 मध्ये आलेल्या बेखुदी चित्रपटातून पदार्पण केले होते. मात्र, हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला. यानंतर ती बाजीगरमध्ये दिसली, जो ब्लॉकबस्टर ठरला. त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही आणि एकापेक्षा जास्त हिट चित्रपट दिले.

काजोलने पती अजय देवगणसोबतही अनेक चित्रपटांमध्ये काम केले. यातील काही हिट तर काही फ्लॉप ठरले. दोघांनी हलचल, गुंडाराज, यू मी और हम, दिल क्या करें, प्यार तो होना ही था, राजू चाचा, टुनपुर का सुपर हीरो, इश्क, तान्हाजी यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.

महत्वाच्या बातम्या-
पती अजय देवगणला बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड भेटल्यानंतर काजोल भावूक, म्हणाली, अभिमानाने
काजोलने बॉलिवूडचे ‘ते’ काळे सत्य केले उघड; म्हणाली, २८ इंच कंबर आणि ३६ इंच छाती
आलिया भट्ट बनली कभी खुशी कभी गम मधील काजोल, रणवीर सिंगसोबतचा तो व्हिडीओ व्हायरल
….अन् मराठीतून बोलायचं म्हणून घाबरली काजोल, थेट मंचावर आईला मारली मिठी; वाचा नेमकं काय घडलं

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now