बॉलिवूडमध्ये सिंघम गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री काजल अग्रवाल मागील काही दिवसांपासून तिच्या प्रेग्नेन्सीच्या बातम्यांमुळे फारच चर्चेत आहे. काजल लवकरच आई होणार असून ती या वर्षी तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नुकतेच काजलचा पती गौतम किचलूने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत काजोलच्या प्रेग्नेन्सीची हिंट दिली होती. त्यानंतर आता काजल तिचा बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसून आली.
काजलने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीला पतीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये काजल आणि तिचा पती गौतम दोघेही ब्लॅक कलरच्या आऊटफिटमध्ये दिसून येत आहेत. या फोटोत काजलचा बेबी बंप स्पष्टपणे दिसून येत आहे. तसेच तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेन्सीचा ग्लो दिसून येत आहे. सध्या काजलचा हा फोटो तिच्या फॅन पेजवर व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/p/CYRFRkmvHND/
यापूर्वी काजलचा पती गौतमने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर काजलचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोद्वारे त्याने काजल प्रेग्नेंट असल्याची बातमी हटके अंदाजात दिली होती. त्याने शेअर केलेल्या फोटोत काजल पिवळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये फारच सुंदर दिसत होती.
हा फोटो शेअर करत गौतमने लिहिले होते की, ‘२०२२ तुझ्याकडे पाहत आहे’. यासोबतच गौतमने एका प्रेग्नेंट महिलेचा इमोजीसुद्धा शेअर केला होता. गौतमच्या या पोस्टनंतर काजलच्या चाहत्यांनी त्या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला.
काजलच्या बाबतीत असे सांगितले जात आहे की, तिने तिचे सर्व वर्क कमिटमेंट पूर्ण केली आहे. आता ती फक्त प्रेग्नेन्सीच्या काळात स्वतःला वेळ देऊ इच्छित आहे. दरम्यान, सध्या काजल तिच्या पतीसोबत गोव्यात असून तिथे व्हेकेशन एन्जॉय करत आहे.
काजल आणि गौतम किचलूने ७ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. ३० ऑक्टोबर २०२० रोजी ते दोघे विवाहबंधनात अडकले. नुकतीच त्या दोघांनी त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला.
महत्त्वाच्या बातम्या :
समीर वानखेडेंची झाली बदली, आता ‘या’ ठिकाणी सांभाळणार महत्वाची जबाबदारी
अरे यांना कोणीतरी आवरा! औरंगाबादेत चालत्या दुचाकीवर प्रेमीयुगुलाचे अश्लील चाळे, पहा व्हिडीओ
.. मग फिरोज खानशी लग्न करून इंदिरा गांधींची मुलं ब्राह्मण कशी?