Share

६३ चिमुकल्यांच्या मृत्यूप्रकरणात जेलमध्ये असणाऱ्या काफील खानला सपाकडून आमदारकीचे तिकीट

गोरखपूरमध्ये बहुचर्चेत असलेले डॉक्टर कफिल खान यांना देवरिया-कुशीनगर स्थानिक विधान परिषदेच्या होणाऱ्या निवडणुकांसाठी समाजवादी पार्टीकडून उमेदवारी मिळाली आहे. डॉक्टर कफिल खान यांना २०१७ मध्ये गोरखपुर रुग्णालयात झालेल्या लहान मुलांच्या मृत्यूला जबाबदार धरत निलंबित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर उत्तर प्रदेशच्या भाजप सरकारने कडक कारवाई केली होती.

सोमवारी हेच काफिल खान आपला उमेदवारीचा अर्ज भरणार आहेत. यासाठी त्यांनी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची बुधवारी भेट घेतली आहे. यावेळी काफिल यांनी अखिलेश यादवांना गोरखपूर रुग्णालयाच्या ट्रेजरीवर आधारित पुस्तक भेट दिले आहे. यूपी बिहारच्या सीमेवर मोफत सुविधाचे रुग्णालय उभारण्याचे स्वप्न काफिल यांचे आहे.

याकारणानेच त्यांची समाजवादी पार्टीकडून उमेदवारी स्विकारली आहे. येत्या ९ एप्रिल रोजी विधान परिषदेच्या ३६ जागांसाठी निवडणुक पार पडणार आहे. सध्या विधान परिषदेत ४८ जागांवर समाजवादी पार्टीची सत्ता आहे. तर भाजपाकडे यातील ३६ जागा आहेत. परंतु सपाचे ८ आणि बसपाचा एक आमदार भाजपमध्ये अगोदरच गेला आहे.

दरम्यान सपाने आता कफिल खानला या निवडणुकीत उभे केले आहे. कफिल खान यांच्यावर २०१७ मध्ये BRD मेडिकल कॉलेजच्या ६३ लहान मुलांच्या मृत्यूचा आरोप लावण्यात आला होता. यावर त्यांनी एक पुस्तक देखील लिहले आहे. २०१७ मध्ये मुलांच्या मृत्यूला जबाबदार धरत कफिल खानला अटक करण्यात आली होती.

परंतु २०१८ मध्ये त्यांच्या विरोधात कोणते पुरावे न सापडल्यामुळे त्यांना न्यायालयाने जामिन दिला. याप्रकरणात त्यावेळी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे या मुलांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले होते. त्यामुळे रुग्णालयातील ८ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. परंतु तरी देखील या प्रकरणात अनेकांची सुटका झाली.

मुख्य म्हणजे काफिल खान मुख्य आरोपींमध्ये असताना देखील त्यांना जामिन देण्यात आला. विशेष म्हणजे २०१९ मध्ये CAA विरोधात मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये भडकाऊ भाषण दिल्यामुळे काफिल यांना पुन्हा अटक करण्यात आली होती. यावेळी त्यांनी पोलिसांवर अनेक गंभीर आरोप लावले होते. तरी देखील त्यांना ९ महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला.

या सर्व प्रकरणानंतर गेल्या वर्षी काफिल खान यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात त्यांनी योगी सरकारवर रुग्णालयात झालेल्या ६३ मुलांच्या हत्येचे आरोप लावले होते. आता याच सरकारविरोधात काफिल खान पुन्हा उभे राहिले आहेत.

त्यामुळे या निवडणुकीत त्यांचा विजय होईल कि परत हार स्विकारावी लागले हे पाहणे महत्वपूर्ण ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपकडून दणदणीत पराभव झाल्यानंतर विधान परिषदेची निवडणुक सपासाठी आव्हानात्मक ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या
गुजरातला फिरायला गेली आणि सुचली ‘ही’ धडाकेबाज आयडिया आता करतेय लाखोंची कमाई
वडिलांनी जमीन विकून व्यवसाय करण्यासाठी दिले २० हजार, मुलाने उभी केली २४०० कोटींची कंपनी
‘सुपरवाईजर म्हणून सही करून २७ हजार ७०० रुपये घातले खिशात’, दरेकरांच्या अडचणीत वाढ
गडकरींनी लाँच केली देशातील पहिली हायड्रोजन कार, एकदा टाकी फुल केल्यास चालणार ६५० किमी

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now