Share

हवा उतरली! भुबन बड्याकरने ‘त्या’ वक्तव्यावर मागितली माफी, म्हणाले, ‘गरज पडली तर पुन्हा शेंगदाणे विकेन’

Kacha Badam

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ‘कच्चा बदाम’ (Kacha Badam) हे गाणं फारच व्हायरल झालं होतं. पश्चिम बंगालमधील एक शेंगदाणे विक्रेते असलेले भुबन बड्याकर यांनी हे गाणं गायलं होतं. या गाण्यामुळे ते फारच लोकप्रिय झाले होते. पण प्रसिद्धी मिळताच भुबन बड्याकर यांचा मात्र फारच तोरा चढला होता. आता मी सेलिब्रिटी झालो असून पुन्हा शेंगदाणे विकणार नाही, असेदेखील त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांना अनेकांनी ट्रोल केले. पण आता भुबन बड्याकर यांनी त्यांच्या वक्तव्याबाबत माफी मागितली आहे.

भुबन बड्याकर नुकतेच एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी त्यांच्या वक्तव्यावर माफी मागितली. त्यांनी म्हटले की, ‘मला आता जाणीव झाली की मी तसं बोलायलं नको होतं. मी आता सेलिब्रिटी झालोय त्यामुळे मी पुन्हा शेंगदाणे विकणार नाही, असे मी म्हणालो होतो. पण तो माझा अहंकार नाही. लोकांनी मला सेलिब्रिटी बनवलं. पण गरज पडली तर मी पुन्हा शेंगदाणे विकेन’.

भुबन बड्याकर यांनी पुढे म्हटले की, ‘मी स्वतःला नशीबवान समजतो की, मला तुम्हा सर्वांकडून इतका प्रेम मिळाला आहे. मी एक सामान्य माणूस आहे आणि आतापर्यंत जगत होतो तसेच जीवन यापुढेही जगणार. मी तुम्हाला आश्वासन देतो की, एक व्यक्ती म्हणून माझ्यात कोणताही बदल झालेला नाही’.

https://youtu.be/uiqrngFTX5k

भुबन बड्याकर हे पश्चिम बंगालच्या बीरभूमी जिल्ह्यातील राहणारे आहेत. पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे. उदरनिर्वाह करण्यासाठी ते घरातील तुटलेल्या वस्तूंच्या बदल्यात शेंगदाणे विकण्याचे काम करत असत. त्यासाठी ते सायकलवर वेगवेगळ्या गावात फिरत शेंगदाणे विकत असत. दररोज ३ ते ४ किलो शेंगदाणे विकून ते २०० ते २५० रूपयांची कमाई करत असत.

शेंगदाणे विकता विकता भुबन ‘कच्चा बदाम’ हे गाणं गात असत. त्यानंतर त्यांचं हे गाणं गातानाचं व्हिडिओ एका व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर या व्हिडिओला रिमिक्स करून युट्यूबवर अपलोड करण्यात आले. तर बघता बघता हा व्हिडिओ त्यानंतर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

या व्हिडिओमुळे गावोगावी फिरून शेंगदाणे विकणारे भुबन एका रात्रीत स्टार झाले. ‘कच्चा बादाम’ या गाण्यामुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्यांनी शेंगदाणे विकण्याचे काम बंद केले. कच्चा बदाम गाणं प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांना इतर अनेक शोमध्ये काम करण्याची संधी मिळाली.

यादरम्यान नुकतीच काही दिवसांपूर्वी भुबन बड्याकर यांचा अपघात झाला होता. त्यांनी एक सेकंड हँड कार खरेदी केली होती. कार चालवायला शिकत असताना त्यांचा अपघात झाला होता. या अपघातात भुबन बड्याकर यांना दुखापत झाली होती. पण आता ते ठीक आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :
२० कोटी देते पण माझ्याशी लग्न कर, चाहतीच्या या विचित्र मागणीवर कार्तिक आर्यनने दिले ‘हे’ मजेशीर उत्तर
अखेर कपिल शर्माने ‘काश्मिर फाईल्स’च्या वादावर सोडले मौन, म्हणाला, आजच्या सोशल मिडीयाच्या जगात..
शेती करणार म्हणून अनेकांनी तिला वेड्यात काढलं, आज 18 कोटींची कंपनी चालवते, वाचा ‘मुळशी पॅटर्न’ मधील अभिनेत्रीची यशोगाथा

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now