Share

‘कच्चा बदाम’ फेम भुबन बड्याकर यांच्या अपघाताचे खरे कारण आले समोर, वाचा नेमकं काय घडलं..

Kacha Badam Fame Bhuban Badyakar

‘कच्चा बादाम’ हे गाणं गाऊन प्रसिद्ध झालेल्या भुबन बड्याकर (Kacha Badam Fame Bhuban Badyakar) यांचा अपघात झाला आहे. पश्चिम बंगालच्या बीरभूमी येथे त्यांचा हा अपघात झाला असून नुकत्याच घेतलेल्या कारचा सराव करत असताना त्यांच्यासोबत ही दुर्घटना घडली आहे. समोर येत असलेल्या बातम्यांनुसार या अपघातात भुबन यांच्या छातीला दुखापत झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

भुबन बड्याकर यांनी नुकतीच एक सेकंड हँड कार खरेदी केली होती. तर आता ते कार चालवायला शिकत होते. कारचा सराव करत असतानाच सोमवारी त्यांचा अपघात झाला. त्यानंतर त्यांना बीरभूमी स्थित सरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. यादरम्यान त्यांची प्रकृती लवकरात लवकर ठीक व्हावी यासाठी अनेकजण प्रार्थना करत आहेत.

https://youtu.be/uiqrngFTX5k

भुबन बड्याकर हे पश्चिम बंगालच्या बीरभूमी जिल्ह्यातील राहणारे आहेत. त्यांच्या कुटुंबात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असे ५ सदस्य आहेत. उदरनिर्वाह करण्यासाठी ते घरातील तुटलेल्या वस्तूंच्या बदल्यात शेंगदाणे विकण्याचे काम करत असत. त्यासाठी ते सायकलवर वेगवेगळ्या गावात फिरत शेंगदाणे विकत असत. दररोज ३ ते ४ किलो शेंगदाणे विकून ते २०० ते २५० रूपयांची कमाई करत.

शेंगदाणे विकता विकता भुबन कच्चा बदाम हे गाणं गात होते. त्यानंतर त्यांचं हे गाणं गातानाचं व्हिडिओ एका व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर या व्हिडिओला रिमिक्स करून युट्यूबवर अपलोड करण्यात आले. तर बघता बघता हा व्हिडिओ त्यानंतर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

या व्हिडिओमुळे गावोगावी फिरून शेंगदाणे विकणारे भुबन एका रात्रीत स्टार झाले. कच्चा बादाम या गाण्यामुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्यांनी शेंगदाणे विकण्याचे काम बंद केले. तसेच हे गाणं प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांना इतर अनेक शोमध्ये काम करण्याची संधी मिळत आहे.

नुकतीच एका म्युझिक कंपनीसोबत भुबन यांनी एक कॉन्ट्रॅक्ट साईन केला आहे. यामध्ये त्यांनी म्युझिक कंपनीसोबत गाणं गायलं आणि व्हिडिओसुद्धा रेकॉर्ड केला आहे. यासाठी त्यांना ३ लाख रूपये मिळाले आहेत. याशिवाय नुकतीच पश्चिम बंगाल पोलिसांनी त्यांचा सत्कार केला होता.

महत्त्वाच्या बातम्या :
‘पुष्पा’ स्टाईल दारूच्या तस्करीचा प्रयत्न फसला, टँकर पाहून पोलिसही झाले अवाक
भारताच्या ‘या’ ऑल राऊंडरची प्रतिस्पर्धींना भीती; भारतीय संघ त्याच्याशिवाय वर्ल्ड कपमध्ये उतरणारच नाही
नको त्या विषयात नाक खुपसू नका, अन्यथा धोतर फेडू; मराठा नेते विनोद पाटलांचा राज्यपालांना इशारा

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now