गेल्या काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री मौनी रॉय बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत विवाहबंधनात अडकली आहे. लग्न झाल्यापासून मौनी रॉय सतत सूरजसोबतचे खास फोटो आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करताना दिसत आहे. सध्या बॉलिवूडमधील सर्वात क्यूट कपलमध्ये मौनी आणि सूरज गणले जात आहेत.
मात्र नुकतीच मौनी रॉयने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळेच या दोघांच्या नात्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहेत. मौनीने तिच्या इंस्टाग्रामवर सूरजसोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना तिने “मिस यू.. लवकर ये!” असे कॅप्शन दिले आहे.
मौनीची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. चाहत्यांनी देखील या पोस्टवर अनेक कमेंट्स केल्या आहेत. तसेच काहींनी सूरज मौनीवर रुसून तिला सोडून गेला आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे.
https://www.instagram.com/p/CcX0MzLquan/?igshid=YmMyMTA2M2Y=
सध्या मौनी आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यामूळे तिला सूरजला वेळ देता येत नाही. दुसरीकडे सूरज देखील आपल्या कामात व्यस्त आहे. त्यामुळे या दोघांवर दुरावा सहन करण्याची वेळ आली आहे. या कारणानेच मौनीने ही भावूक पोस्ट शेअर केली आहे.
दरम्यान लवकरच मौनी रॉय ब्रह्मास्त्र चित्रपटात दिसणार आहे. यापूर्वी देखील तिने अनेक मालिकांमध्ये आणि चित्रपटात काम केले आहे. सर्वात पहिल्यांदा मौनी नागीण या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यानंतर तिने चाहत्यांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले. आज मौनी एक सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी! मुंबईत कलम १४४ लागू, यात्रेदरम्यान दोन गटात तुफान हाणामारी, अनेकांना गंभीर दुखापत
गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणींमध्ये वाढ! भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल, वाचा काय नेमकं प्रकरण
‘…म्हणून शरद पवारांवर गुन्हा दाखल करायला हवा होता; गोपीचंद पडळकर स्पष्टच बोलले
माजी पती नागचैतन्याचे तीन टॅटू शरीरावर गोंदवल्याने समंथाला होतोय पश्चाताप? म्हणाली, कधीच..