Share

Junior NTR च्या लग्नात खर्च झालते तब्बल १०० कोटी; बायकोच्या साडीची किंमत ऐकून चक्कर येईल

Junior NTR

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता ज्युनियर एनटीआरचे (Junior NTR) भारतासह जगभरात करोडो चाहते आहेत. आपल्या दमदार अभिनय आणि डान्सद्वारे तो नेहमीच प्रेक्षकांचे मन जिंकून घेत अ सतो. ‘आरआरआर’ चित्रपटाच्या यशानंतर ज्युनियर एनटीआरच्या लोकप्रियतेत अधिकच भर पडली आहे. यादरम्यान त्याच्यासंबंधित प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यास चाहते नेहमीच उत्सुक असतात. तर गुरुवारी ज्युनियर एनटीआर आणि त्याची पत्नी लक्ष्मी प्रणती त्यांच्या लग्नाचा ११ वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने या दोघांविषयी काही माहिती जाणून घेऊया.

ज्युनियर एनटीआरला (Junior NTR) अभिनयाचा वारसा त्याच्या घरातूनच मिळाला आहे. प्रसिद्ध अभिनेता आणि आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांचा तो नात आहे. तसेच त्याचे वडिल नंदमुरी हरिकृष्णासुद्धा तेलुगू सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते. एनटीआरने ‘बालरामायण’ या चित्रपटाद्वारे बालकलाकाराच्या रूपात सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर ‘नीन्नू चुडालनी’ या चित्रपटाद्वारे तो मुख्य अभिनेता म्हणून पुढे आला. परंतु, ‘स्टुडंट नंबर १’ या चित्रपटामुळे त्याला मुख्य अभिनेता म्हणून खरी ओळख मिळाली.

ज्युनियर एनटीआरने (Junior NTR) २०११ साली ‘स्टुडिओ एन’ या तेलुगू न्यूज चॅनलचे मालक आणि बिजनेसमॅन श्रीनिवास राव यांची मुलगी असलेल्या लक्ष्मी प्रणतीसोबत लग्न केले. २०१० सालीच एनटीआर प्रणतीसोबत लग्न करू इच्छित होता. परंतु, त्यावेळी प्रणतीचे वय केवळ १७ वर्ष होते. त्यामुळे त्यावेळी एका वकिलाने एनटीआरविरोधात बाल विवाह कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली होती.

त्यानंतर एका वर्षांनी ज्युनियर एनटीआरने (Junior NTR) ५ मे २०११ साली लक्ष्मीसोबत अरेंज मॅरेज केला. या दोघांचे लग्न दाक्षिणात्य लग्नांमधील सर्वात महागड्या लग्नांपैकी एक समजले जाते. रिपोर्टनुसार, त्यांच्या लग्नात जवळपास १०० कोटी रूपये खर्च करण्यात आले होते. केवळ लग्नाचे मांडव सजवण्यासाठी १८ कोटी रूपये खर्च झाले होते. त्यांच्या या लग्नात ३ हजार पाहुण्यांसोबत १२ हजारांपेक्षा अधिक चाहते सहभागी झाले होते.

रिपोर्टनुसार, ज्यूनियर एनटीआरची (Junior NTR) पत्नी प्रणतीने लग्नात १ कोटी रूपयांची साडी नेसली होती. त्यांचे लग्न एका प्रादेशिक वाहिनीवरही दाखवण्यात आले होते. एकंदरित त्यांच्या लग्नात पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आल्याचे सांगितले जाते. दरम्यान, एनटीआर आणि प्रणती यांच्यात जवळपास १० वर्षांचे अंतर आहे. परंतु, असे असले तरीही दोघांमध्ये खूप प्रेम दिसून येते. आज ते दोघे सुखाचा संसार करत असून त्यांना अभय राम आणि भार्गव राम अशी दोन मुले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :
‘मॅडम ब्लाऊज घालायच्या विसरल्या वाटतं…’; ‘त्या’ बोल्ड फोटोवरून प्राजक्ता माळी तुफान ट्रोल
VIDEO: सलमानच्या ईद पार्टीत दिसली कंगना; नेटकरी संतापले, ‘सरड्याचा रंग बदलत आहे’
लग्नानंतर लगेच आलिया आली आपल्या जुन्या रुपात, स्विमिंग पूलमध्ये आनंद घेताना दिसली, पहा फोटो

बाॅलीवुड ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now