बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस इंडिया जुही चावला नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होती. त्याकाळी जुही तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायची. तिच्या सौंदर्यावर तर लाखो लोक फिदा होते. जुहीचा असाच एक चाहता आमिर खानचा नातेवाईकसुद्धा होता. जुहीवर फिदा होऊन या चाहत्याने तिला प्रपोजही केला होता. यासंदर्भातला किस्सा स्वतः जुहीने एका पोस्टद्वारे सांगितले आहे.
जुहीला प्रपोज करणारा चाहता म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून आमिर खानचा भाचा आणि अभिनेता इम्रान खान होय. आमिर खान आणि जुही चावला या दोघांनी ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी आमिरसोबत त्याचा भाचा इमरानसुद्धा नेहमी सेटवर यायचा.
यादरम्यान इमरान खानला जुही चावला इतकी आवडली की एके दिवशी त्याने तिला प्रपोजही केले. तसेच त्याने जुही चावलाकडे त्याचे प्रेम व्यक्त केले. मजेशीर गोष्ट म्हणजे त्यावेळी इमरान केवळ ६ वर्षांचा होता. छोट्याशा इमरानचे आपल्यावरील प्रेम पाहून जुहीसुद्धा त्याच्या प्रेमात पडली.
इमरान खानच्या वाढदिवशी जुहीने हा किस्सा शेअर करत इमरानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिने लिहिले की, ‘इमरान जेव्हा ६ वर्षांचा होता तेव्हा त्याने मला प्रपोज केले होते. हिऱ्याची ओळख त्याला तेव्हापासूनच आहे. मला प्रपोज करणाऱ्या सर्वात तरूण व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्यासाठी १०० झाड इमरान’.
इमरानने ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते. त्यानंतर त्याने ‘जो जीता वही सिंकदर’ या चित्रपटातही काम केले. २००८ साली त्याने ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटाद्वारे अभिनेत्याच्या रूपात बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
त्यानंतर त्याने ‘लक’, ‘आई हेट लव्ह स्टोरीज’, ‘ब्रेक के बाद’, ‘दिल्ली बॅली’, ‘मेरे ब्रदर की दुल्हन’, ‘एक मैं और एक तू’, ‘मटरू की बिजली का मन डोला’ यासारख्या अनेक चित्रपटात काम केले. इमरान २०१५ साली ‘कट्टी बट्टी’ या चित्रपटात शेवटचा दिसला होता.
दरम्यान, इमरान चित्रपटांशिवाय त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही फारच चर्चेत राहिला. इमरान आणि त्याची पत्नी अवंतिका लग्नाच्या आठ वर्षानंतर २०१९ साली वेगळे झाले. या दोघांना एक मुलगीसुद्धा आहे. ही मुलगी तिची आई अवंतिकासोबत राहत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
ओमीक्राॅन हा कोरोनाचा विषाणू नाही, ही तर वेगळीच महामारी; तज्ञांनी वेगळेच सत्य आणले समोर
आई म्हणाली, मी प्रेमात आहे, मुलांनी थाटामाटात लावून दिले तिचे दुसरे लग्न; मुंबईच्या मुलांचे देशभरात होतंय कौतूक
आधुनिक ‘श्रावणबाळ’! लस घेण्यासाठी वडीलांना पाठीवर घेऊन मुलाची १२ किलोमीटर पायपीट