Share

God Father: चिरंजीवी अन् सलमानच्या जुगलबंदीने, जबरदस्त स्टाईलने चाहते झाले वेडे, पहा ट्रेलर

Chiranjeevi

Chiranjeevi, God Father, Salman Khan, Bhaijaan/ चिरंजीवीच्या (Chiranjeevi) आगामी ‘गॉड फादर’ (God Father) या चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये चिरंजीवी अतिशय दमदार व्यक्तिरेखेत पाहायला मिळत आहे. हा टीझर पाहून गॉडफादर जिथे पाय ठेवतात तिथे पृथ्वी कशी थरथरू लागते हे कळते. प्रेक्षक त्याच्या स्वॅगकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत.

टीझरची सुरुवात एका अशा बॅकग्राउंडरने होते की, कसा 20 वर्षांपर्यंत गॉडफादरचा ठावठिकाणा माहित नव्हता, परंतु तो सहा वर्षांपूर्वीच्या सीनमध्ये दाखवला आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर चिरंजीवीचा चेहरा अखेर समोर येतो, तो समाजातील शत्रूंचा नायनाट करतो. राजकारण्यांना त्याला मारायचे आहे, पोलिसांना त्याला पकडायचे आहे, परंतु जगातील सर्वात मोठ्या डॉनला जगातील सर्वात मोठा भाई सलमान खानचा पाठिंबा मिळत असतो.

मल्याळम चित्रपट लुसिफरच्या रिमेकमध्ये चिरंजीवी मोहनलालची भूमिका साकारत आहे. गॉडफादरमध्ये सलमान पृथ्वीराज सुकुमारनची भूमिका साकारताना दिसणार आहे, तर नयनतारा मंजू वॉरियरच्या भूमिकेत दिसणार आहे. मोहन राजा दिग्दर्शित या चित्रपटात सलमान पहिल्यांदाच तेलगू चित्रपटात दिसणार आहे.

लाल सिंग चड्ढा ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये, आमिर खानने विचारले की चिरंजीवीने त्याच्या ‘गॉडफादर’ चित्रपटातील भूमिकेसाठी त्याच्याशी संपर्क का केला नाही आणि त्याऐवजी तो सलमान खानसोबत का गेला. चिरंजीवी हसले आणि म्हणाले, या व्यक्तिरेखेसाठी दिल आणि दिमाग वाल्याची गरज नव्हती, तर मजबूत शरीर असणाऱ्याची गरज आहे आणि म्हणूनच आम्ही सलमानसोबत गेलो.

गॉडफादर या चित्रपटात तेलुगू सुपरस्टार चिरंजीवीशिवाय सलमान खान, सत्यदेव कंचरणसह अभिनेत्री नयनतारा यांनीही मुख्य भूमिका साकारल्या आहेत. मोहन राजा दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती कोनिडेला प्रॉडक्शन आणि सुपर गुड फिल्म्सच्या बॅनरखाली होत आहे.

सलमान खानच्या प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर तो अनेक उत्तम चित्रपटांसह मोठ्या पडद्यावर अधिराज्य गाजवण्यास तयार आहे. ‘गॉड फादर’ व्यतिरिक्त सलमान ‘कभी ईद कभी दिवाळी’ या चित्रपटात काम करत आहे. आता या चित्रपटाचे नाव बदलून ‘भाईजान’ करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लडाखमध्ये ‘भाईजान’चे शूटिंग सुरू होते. रविवारीच शूटिंग संपवून सलमान त्याची सहकलाकार पूजा हेगडेसोबत मुंबईला परतला.

सलमान खान आणि पूजा हेगडे यांच्याशिवाय ‘भाईजान’ चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेते व्यंकटेश दग्गुबती आणि जगपती बाबू देखील आहेत. हा चित्रपट 30 डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. याशिवाय चाहते सलमान खानच्या ‘टायगर 3’ या चित्रपटाचीही आतुरतेने वाट पाहत आहेत. टायगर फ्रँचायझीच्या तिसऱ्या चित्रपटात कतरिना कैफ देखील असणार आहे.

तसेच, सलमान खान सुपरस्टार शाहरुख खानचा कमबॅक चित्रपट ‘पठाण’मध्ये देखील कॅमिओ करताना दिसणार आहे. या चित्रपटात दोन्ही स्टार्स जबरदस्त अॅक्शन अवतारात दिसणार आहेत. शाहरुख खानने त्याच्या इंस्टाग्राम लाईव्ह सेशनमध्ये सांगितले होते की, सलमानसोबत ‘पठाण’मध्ये काम करणे त्याच्यासाठी खूप खास होते. तो सलमान खानला आपल्या कुटुंबातील एक मानतो.

महत्वाच्या बातम्या-
Bollywood: सलमान खानची अभिनेत्री ईडीच्या जाळ्यात; तब्बल २०० कोटींच्या घोटाळ्यात ईडीने केले आरोपी
Salman Khan: व्यायाम करताना मागे का ठेवली होती स्टीलची वाटी? सलमान खानचा तो फोटो व्हायरल
Shehnaz Gill : सलमान खानने शहनाज गिलची चित्रपटातून केली हकालपट्टी? स्वत: शहनाजने केला खुलासा, म्हणाली..
बॉलिवूडचे चित्रपट आता फ्लॉप का होत आहेत? अखेर सलमान खानने सोडले मौन, म्हणाला

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now